टीव्हीवरील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री; रुपाली गांगुली, तेजस्वी प्रकाशलाही टाकलं मागे

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील या लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या कामाच्या जोरावर बरीच संपत्ती कमावली आहे. या अभिनेत्रीची मुलगीसुद्धा बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. रुपाली गांगुली, तेजस्वी प्रकाश, हिना खान यांसारख्या अभिनेत्रींनाही तिने मागे टाकलं आहे.

टीव्हीवरील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री; रुपाली गांगुली, तेजस्वी प्रकाशलाही टाकलं मागे
रुपाली गांगुली, श्वेता तिवारी, तेजस्वी प्रकाश
Image Credit source: Instagram
Updated on: Jul 21, 2025 | 8:44 AM

टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग मोठा असतो. त्यांच्या मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. टीव्ही इंडस्ट्रीतून कलाकारांना लोकप्रियता तर मिळतेच, पण त्याचसोबत ते चांगला पैसाही कमावतात. सध्या टीव्हीवर रुपाली गांगुली आणि तेजस्वी प्रकाश यांचं नाणं खणखणीत वाजतंय. रुपालीची ‘अनुपमा’ ही मालिका टीआरपीच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी असते. तर तेजस्वीनेही ‘नागिन’ आणि ‘बिग बॉस’सारख्या शोजमधून चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. परंतु या सर्वांत एक अभिनेत्री अशी आहे, जी कमाईच्या आणि संपत्तीच्या बाबतीत या दोघींनाही मागे टाकू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून तिने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत.

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून श्वेता तिवारी आहे. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. श्वेताची एकूण संपत्ती 81 कोटी रुपयांच्या घरात आहे. विविध शोज आणि जाहिराती यांमधून ती चांगला पैसा कमावते. श्वेता स्टेज शोजसुद्धा करते. यासोबतच तिने ‘बिग बॉस 4’चं विजेतेपदही पटकावलं आहे. श्वेताने ‘कसौटी जिंदगी की’, ‘मेरे डॅड की दुल्हन’, ‘बेगुसराय’, ‘इस जंगल से मुझे बचाओ’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. टीव्ही विश्वात तिला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

इतर कलाकारांविषयी बोलायचं झाल्यास, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीची संपत्ती 20 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय. तर तेजस्वी प्रकाश 25 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. विशेष म्हणजे तेजस्वी ही रुपाली आणि श्वेता यांच्यापेक्षा वयाने लहान आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत भूमिका साकारलेल्या अभिनेत्री शिवांगी जोशीची संपत्ती 37 कोटी रुपये आहे. तर हिना खानकडे 52 कोटी रुपयांची संपत्ती आहे. निया शर्माकडे 70 कोटी आणि दिव्यांका त्रिपाठीकडे 40 कोटी रुपये असल्याचं कळतंय.