Amitabh Bachchan : जया बच्चनसमोरच अमिताभ यांना फुटला घाम, बोलती झाली बंद, काय घडलं तिथे ?

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेली आहेत. अमिताभ हे त्यांचं अदबशीर वागणं, हास्य यामुळे लोकांमध्ये फेमस आहेतच तर जया बच्चन या मात्र फटकून वागत असल्याने लोकं त्यांच्यापासून चार हात लांब राहतात. पण अमिताभ यांनाही जया बच्चन यांची भीती वाटते. खुद्द त्यांनीच हे कबूल केलं की एकदा जया बच्चन यांच्यासमोरच मला घाम फुटला होता, माझी बोलती बंद झाली होती. नेमकं काय घडलं बिग बी यांच्यासोबत ?

Amitabh Bachchan : जया बच्चनसमोरच अमिताभ यांना फुटला घाम, बोलती झाली बंद,  काय घडलं तिथे ?
अमिताभ बच्चन - जया बच्चन
| Updated on: Sep 23, 2025 | 12:45 PM

‘कौन बनेगा करोडपती’ हा शो माहीत नाही अशी व्यक्ती विरळाच. घराघरात आवडीने आजही हा शो पाहिला जातो. फक्त क्विझ शो म्हणून नव्हे तर बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे होस्ट असल्यामुळे त्यांचं बोलणं, अदब, मजेशीर अंदाज, समोरच्याला निवांत वाटावं यासाठी त्यांचे प्रयत्न, या सर्वांमुळेही हा शो लोकप्रिय ठरतो. सध्या कौन बनेगा करोपतीचा 17 वा सीझन, 17 वं पर्व सुरू असून यामध्ये बिग बी पक्त प्रश्न विचारत नाहीत तर समोरच्याला छान बोलतं करतात, कधीकधी ते त्यांच्या आयुष्यातलेही किस्से सांगत असतात. त्यामुळे प्रेक्षकही गुंगून जातात.

हसत खेलत , गप्पा मरात ते हा शो पुढे नेत असतात,त्यामुळे तो पाहणं फार मनोरंजक ठरतं. नुकतंच त्यानी या शोमध्ये एक मजेशीर किस्सा ऐकवला, जेव्हा जया बच्चन या होस्ट बनल्या होत्या आणि अमिताभ स्पर्धकाच्या खुर्चीवर बसले होते.

अमिताभ यांनी सांगितला तो किस्सा

कौन बनगो करोडपतीच्या 17 व्या पर्वाच्या एका भागात पल्लवी निफाडकर ही हॉट सीटवर बसली होती. तिने तिच्या मुलींना शोमध्ये बोलावण्याची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून बिग बींनी तिच्या मुलींना बोलावलं आणि त्यांचं स्वागत केलं. पल्लवीच्या मुली देखील अमिताभ यांना भेटल्या आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. या संभाषणादरम्यान, बिग बी पल्लवीच्या धाकट्या मुलीच्या पारंपारिक पोशाखाचे आणि मोगरा गजऱ्याचे कौतुक केलं. त्यानंतर अमिताभ यांनी एक गुपित सांगितलं की, त्यांची पत्नी, अभिनेत्री जया बच्चन यांनाही गजरा घालायला आवडतो. ते ऐकून सगळेच खुश झाले.

जया बच्चनसमोर बिग बींची बोलती बंद

यानंतर, स्पर्धक पल्लवीसोबत अमिताभ बच्चन गेम खेळायला सुरूवात करतात. तेव्हा स्पर्धक पल्लवी म्हणाली की, जेव्हा समोर अमिताभ बच्चन असतात, तेव्हा स्पर्धक योग्य उत्तर विसरून जातात. मात्र ते ऐकून बिग बी यांनी एक वेगळाच किस्सा सांगितला. ते म्हणाले, की जे लोकं हा शो फॉलो करतात, त्यांना माहीत असेल की एकदा मी देखील स्पर्धकाच्या सीटवर बसलो होतो. तेव्हा माझी पत्नी, जया ही होस्ट बनून हॉट सीटवर बसली होती.

पुढे तो प्रसंग सांगत अमिताभ यांनी संपूर्ण किस्सा कथन केला. ते म्हणाले ‘जेव्हा पत्नी समोर बसलेली असते, तेव्हा सर्वांचीच बोलती बंद होते. माझंही असंच झालं होतं, माझी बोलती बंद झाली. तिला पाहून मी गप्पच झालो ‘ असा मजेशीर किस्सा बिग बी यांनी सुनावला. ते ऐकून उपस्थितांना हसू आवरलं नाही.

 

अमिताभ -जया यांचं लग्न

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन अनेक दशकांपासून एकत्र आहेत. त्यांचे लग्न 3 जून 1973 रोजी झाले. त्यांचे लग्न अतिशय गुप्तरित्या पार पडले. अनेक दशकांपासून ते दोघे एक्तर असून एकमेकांची साथ देत आहेत. त्यांना अभिषेक आणइ श्वेता अशी दोन मुलं, सून, जावई, आणि तीन नातवंडं देखील आहेत.