AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MIFF : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून दरम्यान पार पडणार, 1459 चित्रपटांची नोंदणी

MIFF 2026 : 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF 2026) 15 ते 21 जूनदरम्यान मुंबईत होणार आहे. यंदा 1459 चित्रपटांची नोंदणी झाली असून माहितीपट, लघुपट, अॅनिमेशन चित्रपट, वेव्हज डॉक बाजार आणि विशेष मास्टरक्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे.

MIFF : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून दरम्यान पार पडणार, 1459 चित्रपटांची नोंदणी
Mumbai International Film FestivaImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jun 12, 2026 | 8:00 PM
Share

मुंबई, दि. 12 : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) आयोजित 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 15 ते 21 जून दरम्यान मुंबईत होणार असून यंदाच्या महोत्सवात निवडक माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. महोत्सवाचे आयोजन एनएफडीसी संकुलासह विविध ठिकाणी करण्यात आले आहे. या महोत्सवाला महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे विशेष सहकार्य लाभणार आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा उपस्थित होत्या.

1990 मध्ये सुरू झालेल्या या द्वैवार्षिक महोत्सवाचे हे 19 वे पर्व असल्याचे मगदूम यांनी सांगितले. यंदा महोत्सवासाठी 1459 चित्रपटांच्या नोंदी प्राप्त झाल्या. त्यापैकी स्पर्धा विभागात 144 चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये 92 भारतीय आणि 52 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 202 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या विभागात 46 देशांतील चित्रपटांचा समावेश असून ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल्स’, ‘ऑस्कर विजेते चित्रपट’, ‘रेमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह’, ‘एनएफडीसी रिस्टोर्ड फिल्म्स’, ‘इकोज फ्रॉम नॉर्थईस्ट’ आदी विशेष पॅकेजेस सादर करण्यात येणार आहेत.

महोत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये ज्येष्ठ ॲनिमेशन दिग्दर्शक रेमंड क्रुमे यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह आणि त्यांची विशेष मास्टरक्लास, तसेच प्रसिद्ध माहितीपट निर्माते डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सीक्रेट्स ऑफ वाइल्ड इंडिया’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन यांचा समावेश आहे. यंदा प्रथमच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संयोगाने मराठी माहितीपट आणि लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय ‘इकोज फ्रॉम नॉर्थईस्ट’ या नव्या विभागाचीही भर घालण्यात आली आहे.

महोत्सवादरम्यान 10 मास्टरक्लास, नॉलेज सिरीज, भारतीय माहितीपट निर्माते संघटनेचा (IDPA) ओपन फोरम तसेच दुसऱ्या आवृत्तीतील ‘वेव्हज् डॉक बाजार’ आयोजित करण्यात येणार आहे. डॉक बाजारसाठी 155 प्रस्ताव प्राप्त झाले असून निवडक प्रकल्पांना मार्गदर्शन व उद्योग क्षेत्रातील व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.चित्रपटनिर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेऊन एल अँड टी माइंडट्रीच्या सहकार्याने एआय फिल्ममेकिंग हॅकाथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.

महोत्सवाचे उद्घाटन व समारोप प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात होणार आहे. एनएफडीसीच्या पाच प्रदर्शन स्थळांबरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT), तसेच बांद्रा आणि विलेपार्ले येथील दोन महाविद्यालयांमध्येही चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये एकूण 18 पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून एकूण पारितोषिक रक्कम 45 लाख रुपये आहे. याशिवाय 10 लाख रुपयांचा प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. यंदा व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील चरित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले की, या महोत्सवाशी महामंडळ जोडले गेले असून प्रथम पदार्पण दिग्दर्शकासाठी १ लाखाचे पारितोषिक महामंडळमार्फत देण्यात येते. यावर्षीपासून दादरच्या रविंद्र नाट्य मंदिरात 16 ते 20 जून दरम्यान दररोज सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत 19 निवडक मराठी माहितीपट आणि लघुपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक जाणीव, महिला सक्षमीकरण, मानसिक आरोग्य, ग्रामीण जीवन, वारसा आणि मानवी नातेसंबंध या विषयांवरील चित्रपटांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने मराठी माहितीपटांसाठीची आर्थिक मदत 10 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून, गुणवत्तापूर्ण माहितीपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे श्रीमती म्हसे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ हे केवळ चित्रीकरण सुविधा पुरविण्यापुरती मर्यादित न राहता आशय निर्मिती आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय होत असून मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मितीचे प्रकल्प हाती घेत असल्याची माहितीही श्रीमती म्हसे पाटील यांनी दिली.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड