
भारतासमोर कोरोनाचं संकट आहे. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था मिलियन डॉलर वेगननं कोरोनामुळे ज्या लोकांचे हाल होत आहेत अशा लोकांना थेट मदत करण्यासाठी किमान 100,000 जेवण देण्याचं वचन दिलं आहे.

या उपक्रमाचे सनी लिओनीनं समर्थन केलं असून ती या मोहिमेसाठी विशेष मेहनत घेत आहे.

नुकतंच ती मुंबईतील गरजूंना जेवण वाटताना दिसली.

आपलं मत व्यक्त करताना सनी लिओनी म्हणते, ‘अशा कठीण परिस्थितीत अनेकांसमोर मोठी चिंता आहे ती म्हणजे, मी माझ्या कुटुंबाला किंवा मुलांना खायला कसं देणार? त्यामुळे अगदी मनापासून मी हे काम करतेय.’

या अभियानाला काजल अग्रवाल, जेनेलिया देशमुख, राज कुंद्रा, नेहा भसीन, दिगंगना सूर्यवंशी, साध सय्यद, अनुष्का मंचंद या कलाकारांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

मिलियन डॉलर व्हेगन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्वयंसेवी संस्था आहे आणि जागतिक स्तरावरही ही मोहीम राबवत आहे.

येत्या आठवड्यांत, स्वयंसेवी संस्था वैद्यकीय कामगार, स्थलांतरित कामगार, निवारा, झोपडपट्टी-रहिवासी कुटुंब आणि इतर वंचितांना अग्रभागी ठेवत भारतातील नऊ शहरांमध्ये 100,000 जणांना जेवण देईल.

मिलियन डॉलर वेगननं 2020 मध्ये शिल्पा शेट्टी, रकुल प्रीत, ईशा गुप्ता आणि मल्लिका शेरावत सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केलं.

आता, भारतातील बर्याच भागांमध्ये निराशेची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे स्वयंसेवी संस्थेनं पुन्हा एकदा हे काम हाती घेतले आहे.