गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय, ‘आपल्याला ती ऑफर आली तर आपण नाही म्हणणार नाही’

सलमान खान सहभागी असलेले बिग बॉस असो किंवा मराठीत महेश मांजरेकर सहभागी असलेले बिग बॉस असो दोन्ही मालिकांना वादाची किनार आहे.

गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय, आपल्याला ती ऑफर आली तर आपण नाही म्हणणार नाही
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Sep 30, 2022 | 8:18 PM

Gulabrao Patil : शिवसेना आमदार (shivsena Mla) तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरुन चर्चेत असतात. आताही एका वेगळ्या कारणावरुण चर्चेत आले आहे. मराठी बिग बॉसमध्ये (Big Boss) जाण्याची त्यांनी इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. इतकंच काय तर मागील जीवनात नाटकं आणि गाण्यांमध्ये मी भाग घ्यायचो अशी पुष्टी देखील गुलाबराव यांनी जोडली आहे. याशिवाय मला जर कुणी बोलावलं तर मी बिग बॉसमध्ये जाईल. अशी संधी कुणालाही मिळत नाही. अशी सोन्यासारखी संधी आली तर मी नक्की जाईल अशी इच्छा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

गुलाबराव पाटील हे शिंदे गटाचे आमदार असून त्यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाचे मंत्रिपद असून ते जळगाव मतदार संघाचे आमदार आहे.

सलमान खान सहभागी असलेले बिग बॉस असो किंवा मराठीत महेश मांजरेकर सहभागी असलेले बिग बॉस असो दोन्ही मालिकांना वादाची किनार आहे.

01 ऑक्टोबरला हिन्दी बिग बॉसच्या मालिकेला सुरुवात होत आहे तर दुसरीकडे मराठी बिग बॉस देखील 2 ऑक्टोबरला सुरू होणार आहे.

बिग बॉसमध्ये जाण्याची अनेक कलाकारांची इच्छा असते त्यात संधी मिळावी यासाठी अनेक जण उत्सुक असतात.

पण राजकीय क्षेत्रातील मंडळींना देखील बिग बॉस मध्ये जाण्याची इच्छा असल्याचे गुलाबराव पाटील यांच्या प्रतिक्रियेवरुण दिसून येत आहे.

बिग बॉसची कलाकार मंडळीमध्ये मोठी क्रेझ असून त्यात सहभागी वादातीत व्यक्तींना मोठी प्रसिद्धी मिळत असते.

बिग बॉस ही मालिका एक प्रकारचा खेळ आहे. तीन महीने चालणारा हा खेळ नेहमीच वादामुळे गाजला आहे.