
‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मीरा जोशी सध्या नवनवीन गोष्टींमुळे चर्चेत असते.

आता जवळजवळ 2 वर्षांनंतर मीरा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत मीरा झळकणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच मीरानं जगातील सर्वात उंचीवर असलेल्या तुंगानाथ मंदिरात नृत्य करण्याचा विक्रम केला होता.

मीरा नवी मालिका करणार म्हटल्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ पाडणार हे नक्की आहे. त्यात आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असणार म्हटल्यावर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.