Miss Universe 2022: अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रिएलने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब; मुकूट सोपवताना हरनाज संधू भावूक

'मिस युनिव्हर्स'च्या डोक्यावर तब्बल इतक्या कोटींचा रत्नजडीत मुकूट; जगभरातल्या 84 स्पर्धकांना दिली मात

Miss Universe 2022: अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रिएलने जिंकला मिस युनिव्हर्सचा किताब; मुकूट सोपवताना हरनाज संधू भावूक
Miss Universe 2022: अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रिएलने जिंकला 'मिस युनिव्हर्स'चा किताब
Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 15, 2023 | 11:41 AM

अमेरिका: 71 व्या ‘मिस युनिव्हर्स’ या सौंदर्यस्पर्धेचं आयोजन अमेरिकेतल्या लुइजियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात करण्यात आलं होतं. ‘मिस युनिव्हर्स 2022’चा किताब अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रिएलने जिंकला. जगभरातील 84 स्पर्धकांना तिने मात दिली. माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधूने तिला मुकूट सोपवला. टॉप 3 स्पर्धकांमध्ये वेनेझुएलाची अमांडा डुडामेल न्युमेन, अमेरिकेची आर बॉनी गॅब्रिएल आणि डॉमिनिकन रिपब्लिकची एंडिना मार्टिनेस यांचा समावेश होता. तर भारताचं प्रतिनिधित्व करणारी दिविता राय हिने टॉप 16 मध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. मात्र ती टॉप 5 मधून बाहेर पडली.

कोण आहे आर बॉनी गॅब्रिएल?

मिस युनिव्हर्स 2022 चा किताब जिंकणारी आर बॉनी गॅब्रिएल ही अमेरिकेच्या ह्युस्टन, टेक्सास इथली राहणारी आहे. ती फॅशन डिझायनर आहे. तिची आई अमेरिकी आणि वडील फिलिपिन्सचे आहेत.

नव्या मुकूटमध्ये काय आहे खास?

या वर्षी मिस युनिव्हर्सला नवीन मुकूट देण्यात आला. या मुकूटाला Mouawad ने डिझाइन केलं आहे. त्याची किंमत जवळपास 46 कोटी रुपये इतकी आहे. या मुकूटाला तब्बल 993 रत्न लावलेले आहेत. ज्यामध्ये 110.83 कॅरेट नीलम आणि 48.24 कॅरेट पांढरे डायमंड आहेत. या मुकूटावर रॉयल ब्लू रंगाचा नीलम 45.14 कॅरेटचा आहे.

गेल्या वर्षी भारताच्या हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. लारा दत्ता आणि सुष्मिता सेननंतर हरनाजने तिसऱ्यांदा मिस युनिव्हर्सचा मुकूट आपल्या नावे केला होता. आर बॉनी गॅब्रिएलला मुकूट सोपवण्यासाठी मंचावर आलेली हरनाज भावूक झाली होती. मिस युनिव्हर्सच्या मंचावर पुन्हा एकदा येणं सौभाग्याचं आहे, असं म्हणताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.