AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉडल रेबेका लँड्रिथची निर्घृण हत्या, गळा, डोके आणि छातीवर 18 गोळ्या झाडल्या, मारेकऱ्यांकडून मृतदेहाची विटंबना

मॉडेल रेबेका लँड्रिथची (Rebecca Landrith)ची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पेनिसिल्वेनिया येथे रेबेकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला.

मॉडल रेबेका लँड्रिथची निर्घृण हत्या, गळा, डोके आणि छातीवर 18 गोळ्या झाडल्या, मारेकऱ्यांकडून मृतदेहाची विटंबना
| Updated on: Feb 13, 2021 | 11:32 AM
Share

मुंबई : मॉडल रेबेका लँड्रिथची (Rebecca Landrith)ची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पेनिसिल्वेनिया येथे रेबेकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला. रेबेकाच्या डोक्यात, मान आणि छातीवर 18 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर तिच्या मृतदेहाची विटंबना केल्याचीही चर्चा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेबेकोवर 18 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. (Model Rebecca Landrith was shot and killed with 18 bullets)

पोलिसांचा असा संशय आहे की, आरोपीने रेबेकाचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यापूर्वी मृतदेहाची विटंबना केली आहे. पोलिसांचा असा अंदाज आहे की, तिचा मृतदेह मिळाल्याच्या काही तासापूर्वीच रिबेकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, रेबेकाला 18 गोळ्या घालून ठार मारण्यात आले असल्याचे पोस्टमार्टमवरून कळले आहे.

जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या शरीरावरुन कोणतीही आयडी सापडली नव्हती. यामुळे तिची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना तिच्या बोटांचे ठसे घेऊन तिची ओळख पटवावी लागली. रेबेकाच्या खून प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली असून पोलिसांना तो व्यक्ती घटनास्थळापासून 250 मैल दूर भेटला, त्या व्यक्तीचे नाव ट्रेसी असून त्याच्यावर हत्या आणि मृतदेहाची विटंबनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना त्याच्या ट्रकमध्ये रक्ताचे डाग आणि गोळ्याचे शेल सापडले आहेत. पोलिसांनी मोबाईल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना समजले की रेबेकाची हत्या झाली तेव्हा आरोपीचे लोकेशनही तेच होते. रेबेकाच्या हत्येच्या बातमीमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पाच बहिणींमध्ये रेबेका सर्वात लहान होती. 2014 रेबेका मिस मॅनहीटन स्पर्धेची ती अंतिम स्पर्धकही होती. रेबेकाचे नाव मॉडेल आणि फॅशन जगतामध्ये खूप मोठे आहे यामुळे तिच्या अशाप्रकारच्या हत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या : 

Tiger 3 | दबंग खानच्या चित्रपटात इमरान हाश्मी व्हिलनच्या भूमिकेत !

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

अक्षय कुमारच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सने नाकारलं, आता थिएटरच्या आडोशाला!

(Model Rebecca Landrith was shot and killed with 18 bullets)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.