
मुंबई : मौनी रॉय हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मौनी रॉय (Mouni Roy) हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. मौनी रॉय हिला एकता कपूर (Ekta Kapoor) हिने नागिन मालिकेत काम करण्याची संधी दिली. नागिन मालिका ही मौनी रॉय हिची पहिलीच मालिका. त्यानंतर कधीच मौनी रॉय हिने आयुष्यात मागे वळून बघितले नाही. मौनी रॉय हिचा जबरदस्त असा चाहता वर्गही बघायला मिळतो.
मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. गेल्या काही दिवसांपासून मौनी रॉय ही आपल्या पतीसोबत विदेशात राहत आहे. मात्र, असे असतानाही ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायमच सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. काही दिवसांपूर्वीच मौनी रॉय हिची तब्येत खराब झाली, त्याचे तिने फोटोही शेअर केले.
मौनी रॉय हिने हाॅस्पीटलमधील फोटो शेअर केले. यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. मौनी रॉय हिने नुकताच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मौनी रॉय हिने शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मौनी रॉय हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहे.
मौनी रॉय या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहे. मौनी रॉय ही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. मौनी रॉय हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. मिनी ड्रेसमध्ये बोल्ड अदा या व्हिडीओमध्ये दाखवताना मौनी रॉय ही दिसलीये. मौनी रॉय हिच्या या व्हिडीओवर तिचे चाहते हे प्रचंड प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
मौनी रॉय हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ कायमच व्हायरल होताना दिसतात. मौनी रॉय ही काही दिवसांपूर्वीच विदेशात दिशा पटानी हिच्यासोबत धमाल करताना दिसली. दिशा पटानी हिने अनेक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मौनी रॉय हिने साडीवर देखील खास फोटोशूट केले. तिचा हा लूकही चाहत्यांना आवडला.