Spider-Man No Way Home review : टॉम हॉलंडची चालली जादू, जाणून घ्या कसा आहे स्पायडर मॅन चित्रपट

| Updated on: Dec 16, 2021 | 5:28 PM

मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपट स्पायडर-मॅन नो वे होम (Spider-Man No Way Home) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. स्पायडर मॅनच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून हा चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये जात आहेत.

Spider-Man No Way Home review : टॉम हॉलंडची चालली जादू, जाणून घ्या कसा आहे स्पायडर मॅन चित्रपट
स्पायडर मॅन
Follow us on

कलाकार – टॉम हॉलंड, झेंडाया, बेनेडिक्ट कंबरबॅच, जेकब बटालोन आणि अल्फ्रेड मोलिना
दिग्दर्शक – जॉन वॉट्स
रेटिंग- 3.5 स्टार
प्लॅटफॉर्म – थिएटर

मुंबई : मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपट स्पायडर-मॅन नो वे होम (Spider-Man No Way Home) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. स्पायडर मॅनच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून हा चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये जात आहेत. जर तुम्ही चित्रपट पाहणार असाल तर आधी चित्रपटाचा रिव्ह्यू (Review) जाणून घ्या…

कथा
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर तिथून सुरुवात होते तिथून तीन वर्षांपूर्वी स्पायडर-मॅन फार फ्रॉम होमवर संपला होता. शेवटच्या भागातच पीटर पार्कर हा खरा स्पायडरमॅन असल्याचे मिस्टेरियोने सांगितले होते. ज्यानंतर पीटर स्पायडरमॅन असल्याचे सर्वांना कळले आहे. यानंतर पीटरला त्रास होऊ लागतो. पीटरला वाटते, की जर त्याने लोकांची स्मृती गायब केली तर सर्वकाही ठीक होईल. त्यासाठी तो डॉक्टर स्टीफन स्ट्रेंजची मदत घेतो. डॉक्टर आपल्या शक्तीच्या जोरावर हे करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याच दरम्यान असे काही घडते की वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिलन (खलनायक) येतात. पुढे काय होणार, यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल.

रिव्ह्यू
दिग्दर्शकाने एका गोष्टीने चित्रपट खास बनवला आहे. म्हणजेच चित्रपटात पहिल्या स्पायडर मॅनची म्हणजेच टोबे मॅग्वायर आणि अँड्र्यू गारफिल्डची एन्ट्री. या सर्वांना एकत्र पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. यासोबतच सुपरव्हिलनना त्यांच्या विश्वात परत पाठवण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. चित्रपटाचे संगीत आणि स्पेशल इफेक्ट्स हे त्याचे जीवन आहे जे लोकांना बांधून ठेवते.

का पहावा?
टॉम हॉलंडने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. तो त्याच्या भावना पूर्वीपेक्षा चांगल्या प्रकारे दाखवू शकला. टॉमचे पात्रही छान आहे. त्याचा आणि डॉक्टर स्ट्रेंजचा मिरर डायमेंशनल अॅक्शन सीन थक्क करतो. टॉम, टोबी, अँड्र्यू या तिन्ही स्पायडर-मॅन स्टार्सला एकत्र पाहणे पर्वणीच आहे. जर तुम्हाला स्पायडर मॅन मालिका आवडत असेल आणि तुम्हाला अॅक्शन-पॅक्ड चित्रपट पाहायचे असतील तर तुम्ही हे पाहू शकता. हा चित्रपट भावनांनी भरलेला आहे.

Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या ‘या’ गाण्याचे व्हर्जन

Shilpa Shetty : बघावं ते अजबच! हातात पोराचा हात, सलवारशिवाय शिल्पा शेट्टी चक्क रस्त्यावर दिमाखात!

Bollywood Corona | आधी पार्टी , मग क्वारंटाईन, बॉलिवूडवर कोरोनाचे सावट,अभिनेता संजय कपूर यांचं घराबाहेर लागले क्वारंटाईनचे बोर्ड