AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मी लै हाणीन.. बहीण गौतमीच्या लग्नानंतर मृण्मयी देशपांडेची भावूक पोस्ट

छोट्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं भावूक पोस्ट लिहिली आहे. या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये, असं तिने म्हटलंय. 'माझा होशील ना' फेम गौतमीने स्वानंद तेंडुलकरशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नानंतर मृण्मयीने नवविवाहित दाम्पत्याला सल्लासुद्धा दिला आहे.

तर मी लै हाणीन.. बहीण गौतमीच्या लग्नानंतर मृण्मयी देशपांडेची भावूक पोस्ट
Gautami and Mrunmayee DeshpandeImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 27, 2023 | 12:03 PM
Share

मुंबई : 27 डिसेंबर 2023 | ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच लग्नबंधनात अडकली. स्वानंद तेंडुलकरशी तिने लग्नगाठ बांधली आहे. धूमधडाक्यात हे लग्न पार पडल्यानंतर आता बहीण मृण्मयी देशपांडेनं भावूक पोस्ट लिहिली आहे. बहिणीचं लग्न झाल्यानंतर तिच्या मनात नेमक्या काय भावना आहेत याबद्दल व्यक्त होत असतानाच तिने नवविवाहित दाम्पत्याला सल्लासुद्धा दिला आहे. मृण्मयीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

मृण्मयी देशपांडेची पोस्ट-

‘अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली. या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये. आनंद, काळजी, आता ती ऑफिशिअली दुसऱ्याची झाली याचं दुःख आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद. सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत. काल परवापर्यंत ताईचं शेपूट असणार आमचं बाळ ‘संसार’ करताना बघणं मजेचं असणार आहे. यापुढे आम्हा बहिणींची गॉसिप्स एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर, “ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो..” ही तिची तक्रार संपेल. कारण तिचं तिलाच कळेल,’ अशा शब्दांत मृण्मयीने भावना व्यक्त केल्या आहेत.

पोस्टमध्ये पुढे तिने नवविवाहित दाम्पत्याला सल्लासुद्धा दिला आहे. ‘स्वानंद… तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये. लग्नाआधीच तू फॅमिली मेंबर झाला होतासच. गौतमी स्वानंदची काळजी घे. स्वानंद गौतमची साथ सोडू नकोस. संसार कोणाचाच सोपा नसतो. पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणीवर मात करता येते. कदाचित सहज नाही. पण मात करता येते. एकमेकांवर विश्वास असू द्या, संवाद असू द्या. नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते. एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा. एकमेकांना सांभाळून घ्या. आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात. दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत. सगळ्यांची काळजी घ्या आणि मी एवढं प्रेमाने बोलूनसुद्धा, एवढं छान लिहूनसुद्धा वेड्यासारखे वागलात तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा. लै हाणीन,’ असं तिने म्हटलंय.

गौतमी देशपांडेचा पती स्वानंद हा प्रसिद्ध कंटेट क्रिएटर ग्रुपचा बिझनेस हेड आहे. त्यामुळे दोघंही मनोरंजन क्षेत्रात काम करणारे आहेत. ‘Did I hear beautiful? To the Beginnings’, असं कॅप्शन देत गौतमीने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.