
Happy Birthday Mugdha Godse : ‘फॅशन’मध्ये प्रियांका चोप्रा आणि कंगना रणौतच्या भूमिकेचं जेवढं कौतुक झालं तेवढंच कौतुक जॅनेटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचही झालं. बिनधास्त अंदाजात सोशल मीडियावर खळबळ उडवणाऱ्या या अभिनेत्रीने ‘फॅशन’द्वारे चित्रपटात पदार्पण केलं. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नव्हे, तर मराठमोळी मुग्धा गोडसे (Mugdha Godse). फॅशन नंतर ती अनेक हिंदी, मराठी , साऊथच्या चित्रपटातही झळकली. मुग्धाचा आज 37वा वाढदिवस असून त्या निमित्ताने तिच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
मुग्धाचा जन्म 26 जुलै, 1986 रोजी पुण्यातील सामान्य कुटुंबात झाला. आज तिची इंडस्ट्रीतील चांगलीअभिनेत्री म्हणून ओळख असली तरी त्यासाठी तिने बराच संघर्ष केला. बॉविलूडमधील तिचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. रिपोर्ट्सनुसार, मुग्धा एकेकाळी पेट्रोलपंपावर काम करायची. तिथे ढोर मेहनत करून ती दिवसाला 100 रुपये कमवायची.
मिस इंडिया स्पर्धेत झाली होती सहभागी
मुग्धाने ग्लॅमरच्या दुनियेतील कामाची सुरूवात मॉडेलिंग पासून केली. 2002 हे वर्ष मुग्धाच्या आयुष्यात खूप महत्वाचं ठरलं. त्या एका वर्षाने तिचं अख्खं आयुष्यच बदलून गेलं. याच वर्षी मुग्धाने बेस्ट मॉडेल आणि बेस्ट पोशाख हा पुरस्कार जिंकला. त्यानंतर 2004 साली मुग्धाने फेमिना मिस इंडियात स्पर्धेत सहभाग घेतला , तेथे ती सेमी-फायनलपर्यंत पोहोचली.
अनेक चित्रपटांत केले काम
मॉडेलिंगमध्ये यश मिळवल्यानंतर मुग्धा अनेक जाहिरातींमध्ये झळकली आणि तिथूनच तिचा अभिनयातील प्रवास सुरू झाला. प्रियांका चोप्रा, कंगना रणौत, अक्षय खन्ना, अजय देवगण, अन्नू कपूर यांसारख्या दिग्गज अभिनेत्री-अभिनेत्यांसोबत तिने काम केलं आहे. फॅशन चित्रपटातील तिच्या कामाचंही खूप कौतुक झालं. मुग्धाने ‘ऑल द बेस्ट’, ‘जेल’, ‘साहेब बीवी और गॅंगस्टर ’ आणि‘हिरॉइन’ यासांरख्या अनेक हिंदी चित्रपटात काम केलं. तसेच मराठी आणि साऊथमधील काही चित्रपटांतही ती झळकली.
18 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे मुग्धा
प्रोफेशनल लाइफप्रमाणेच पर्सनल आयुष्यामुळेही मुग्धा चर्चेत असते. 18 वर्षांनी मोठा असलेला अभिनेता राहूल देव आणि मुग्धा यांच्या रिलेशनशिपची बरीच चर्चा झाली होती. राहुलच्या पहिल्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्याला एक मुलगाही आहे. त्याच्या मुलासाठीच राहुलने परत लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून राहूल व मुग्धा हे दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये आहेत.