AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : CJP वर भडकले मुकेश खन्ना, जेन झिंना खडसावत म्हणाले, ‘घाणेरड्या गटारातील किड्यांसारखे…’

Video : 'या झुरळांना बाहेर फेकून द्या... जे केलंय त्याचे परिणाम...', कॉक्रोच जनता पार्टी आणि जेन झींवर मुकेश खन्ना यांचा संताप, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, 'घाणेरड्या गटारातील किड्यांसारखे...', मुकेश खन्ना यांच्या पोस्टनंतर उडाली सर्वत्र खळबळ

Video : CJP वर भडकले मुकेश खन्ना, जेन झिंना खडसावत म्हणाले, 'घाणेरड्या गटारातील किड्यांसारखे...'
अभिनेते मुकेश खन्ना
| Updated on: Aug 01, 2026 | 8:52 AM
Share

नुकताच बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप महिला खासदार कंगना राणौत यांनी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि आंदोलन करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. जेन झींना ‘गटर छाप’ म्हणत कंगना यांनी विद्यार्थांवर निशाणा साधला आहे. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील जंतरमंतर येथे आंदोलनासाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांवर संताप व्यक्त आहे. एवंढच नाही तर, या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपशब्द वापरणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांवरही खन्ना यांनी कडक शब्दांत टीका केली. एक व्हिडिओ शेअर करत मुकेश खन्ना यांनी आपला संताप व्यक्त केला आणि म्हटलं, “खूप उशीर होण्याआधी या झुरळांना बाहेर फेकून द्या.”

सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत मुकेश खन्ना म्हणतात, ‘मी सध्या भारताबाहेर आहे. पण रिल्स, इन्स्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून भारतात काय सुरु आहे. याकडे माझं लक्ष आहे. दोन दिवसांपूर्वी देखील मी एक व्हिडीओ पोस्ट केलेला, ज्यामध्ये मी जेन झींबद्दल चिंता व्यक्त केलेली. जर हे आपले जेन झी आहे तर येणाऱ्या 25 वर्षांत आपला देश यांच्या खांद्यावर असणार आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या आपल्या देशाचे काय हाल होणार आहेत. तरीही, या मुद्द्याबाबत मी जे पाहिलं आणि लोकांकडून जे ऐकलं आहे, त्यावरून मला असं वाटतं की बहुसंख्य लोकांचं असं मत आहे की हे आपल्या देशाचे खरे विद्यार्थी नाहीत. NEET किंवा पेपरफुटीसारख्या मुद्द्यांवर आंदोलन करणारे हे विद्यार्थी नाहीत.’

‘हे लोक सरकार पाडण्याचा मोठा हेतू घेऊन पुढे आले आहेत, त्यांनी पंतप्रधानांच्या आई – बहिणीबद्दल अपशब्द वापरले आहेत आणि रात्री पार्टी करताना दिसले आहे… मी देखील हा व्हिडीओ पाहिला आहे, कदाचित तुम्ही देखील पाहिला असेल… हे विद्यार्थी प्रतिनिधित्व करु शकत नाही. जो खरंच अडचणींचा सामना करत आहेत … मला असं वाटतं हे झुरळांप्रमाणे आहेत, जसं की घरात झुरळ येतात आणि आपण त्यांना बाहेर काढून टाकतो… त्याचप्रमाणे, जे लोक कॅमेऱ्यासमोर येतात आणि अशी घाणेरडी भाषा वापरतात, त्यांनाही हटवलं पाहिजे आणि दूर ठेवलं पाहिजे. ‘

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, “माझ्या मते, खऱ्या अर्थाने हे आंदोलन नीट (NEET) शी संबंधित नव्हतंच किंवा ती विद्यार्थ्यांचं आंदोलन देखील नव्हतं. हे एक एक स्पॉन्सर्ड आंदोलन होतं, ज्यासाठी प्रचंड आर्थिक पाठिंबा देण्यात आलेला. मला असं वाटतं की, यात सहभागी असलेल्यांपैकी काही जण केवळ थोड्याशा पैशांसाठी देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

”मला त्या मुलांना असं देखील सांगायचं आहे की, कॅमेऱ्यासमोर तुम्ही जे काही बोललात किंवा केलं आहे, त्याचा तुमच्या भविष्यातील आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो, याची कदाचित तुम्हाला अजून जाणीव नसेल. अशा लोकांपासून दूर राहा; ते केवळ तुमचा वापर करून घेतील आणि नंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतील. अन्यथा, तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कदाचित नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल किंवा नंतर तुमच्या करिअरवर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे, आपल्या भविष्याचा विचार करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या.’, असं देखील मुकेश खन्ना विद्यार्थ्यांना म्हणाले आहेत.

एवढंच नाही तर, व्हिडीओ पोस्ट करत कमेंटमध्ये मुकेश खन्ना यांनी विद्यार्थ्यांना चेतावनी दिली आहे. कॅप्शनमध्ये म्हणाले, ‘त्यांच्या प्रभावाखाली येऊन भरकटलेल्या आणि अत्यंत भयंकर गोष्टी बोललेल्या तरुणांना मला एक इशारा द्यायचा आहे, तुमची विधाने इतिहासात नोंदवली गेली आहेत. त्यांच्या संगतीमुळे तुम्ही स्वतःच एखाद्या घाणेरड्या गटारातील किड्यांसारखे बनला आहात. तुम्हाला याचे परिणाम भोगावेच लागतील. पोलीस तुम्हाला मदत करणार नाहीत. लोक तुम्हाला कामावर ठेवण्यास कचरतील. सरकारी मदत बंद केली जाईल. कदाचित तुम्हाला व्हिसाही मिळणार नाही. त्यामुळे, त्यांच्या विळख्यातून लवकरात लवकर बाहेर पडा.’ सध्या मुकेश खन्ना यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा