CJP आंदोलनामुळे आमिर खानच्या भाच्याच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी दाखल केला FIR; काय घडलं नेमकं?

Imran Khan : मुंबई पोलिसांनी इम्रान खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, अभिनेता इम्रान खान, अली भोजानी आणि इतर ३०० ते ४०० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

CJP आंदोलनामुळे आमिर खानच्या भाच्याच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी दाखल केला FIR; काय घडलं नेमकं?
| Updated on: Oct 11, 2026 | 3:37 PM

दिल्लीनंतर मुंबईतही CJP आंदोलनाला सुरुवात झाली. बॉलिवूड अभिनेता इम्रान खाननेही मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. त्याची गर्लफ्रेंड, लेखा वॉशिंग्टन आणि चुलत भाऊ, झैन मारी खान हेही उपस्थित होते. आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी कारवाई करत या तिघांनाही ताब्यात घेतलं. मात्र, आता ते घरी परतले आहेत.

इम्रान खानविरोधात एफआयआर दाखल

Loading...

मुंबई पोलिसांनी आता इम्रान खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, अभिनेता इम्रान खान, अली भोजानी आणि इतर ३०० ते ४०० जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम २२३, १२६(२), १८९(२), १८९(३) आणि १८९(५) अंतर्गत गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

इम्रान खान आंदोलनात का सामील झाले?

आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना इम्रान खाननं सांगितलं की, तो कोणत्याही पक्षाच्या वतीने नव्हे, तर मुंबईचा एक सामान्य नागरिक म्हणून आंदोलनात सामील झाला आहे. इम्रान म्हणाला, ‘माझ्या कोणत्याही मागण्या नाहीत. मी या शहरात राहणारा एक नागरिक आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून येथे आलो आहे. लोकांच्या फिरण्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध का घातले जात आहेत आणि त्यांचा आवाज का दाबला जात आहे, हे पाहण्यासाठी मी आलो आहे. म्हणूनच मी येथे आहे.’

इम्रान खाननं अटकेची खिल्ली उडवली

अटक झाल्यानंतर, इम्रान खाननं आता आपल्या खास शैलीत या संपूर्ण घटनेवर टोला लगावला आहे. त्यानं अभिनेता आर्या बब्बरच्या इन्स्टाग्राम रीलवर कमेंट केली आणि पोलीस व्हॅनमधल्या आपल्या वेळेची विनोदी आठवण सांगितली. आर्य बब्बरच्या व्हिडिओवर कमेंट करत इम्रान म्हणाला की, ‘प्रवास खूपच वाईट होता, सस्पेंशन खराब होतं, एसी नव्हता, म्युझिक सिस्टीम नव्हती…’

 

अटक झाल्यानंतर, इम्रान खाननं इन्स्टाग्रामवर पोलीस व्हॅनच्या आतून एक फोटो शेअर केला. ‘वाटतंय की, मी गाडी चालवायला निघालोय’ असं अभिनेत्यानं कॅप्शन लिहिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us