AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra : धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर असताना ‘त्या’ 30 मिनिटांत काय घडलं, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Dharmendra Death : 24 नोव्हेंबर 2025 मध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसली आहे... अनेक जण धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या शेवटच्या आठवणी सांगत आहेत.

Dharmendra : धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर असताना 'त्या' 30 मिनिटांत काय घडलं, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
अभिनेते धर्मेंद्र
| Updated on: Nov 27, 2025 | 9:30 AM
Share

Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडला मोठी धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले… तर अनेकांनी त्यांच्यासोबत असलेल्या आठवणी सांगितल्या. निधनापूर्वी धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. तेव्हा अनेकांनी धर्मेंद्र यांना भेटण्याचा प्रयत्न देखील केला. अभिनेत्री मुमताज देखील धर्मंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. तेव्हा रुग्णालयात काय घडलं याबद्दल मुमताज यांनी सांगितलं आहे.

धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना भावूक झालेल्या मुमताज म्हणाल्या, ‘धर्मेंद्र आणि मी काही सिमेमांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि ते कायम एक उत्तम सह-कलाकार राहिले… उत्तम व्यक्ती… ज्याचं मन खरंच सोन्यासारखं होतं… सर्वांसोबत जुळवून घेणारे… शेवटपर्यंत त्यांचे सर्वांसोबत चांगले संबंध होते… आज देखील लोक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात आणि कायम करत राहतील… धर्मेंद्र एक असे व्यक्ती आहेत ज्यांना कोणी विसरुच शकणार नाही… त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही…’

मुमताज पुढे म्हणाल्या, ‘2021 मध्ये आमची शेवटची भेट झाली होती… ती एक शांत दुपार… मला नव्हतं माहिती की ती आमची शेवटची दुपार असेल… ती शेवटची वेळ होती जेव्हा आम्ही भेटलो होतो…’, सांगायचं झालं तर, मुमताज आणि धर्मेंद्र यांनी ‘झील के उस पार’, ‘लोफर’ यांरख्या सिनेमांमध्ये काम केलं होतं.

रुग्णालयात काय झालं होतं?

धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असताना मुमताज यांनी त्यांना एकदा भेटण्याचा प्रयत्न केला. ‘मी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात देखील गेली होती. पण ते व्हेंटिलेटरवर होते… कोणालाच त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती… मी रुग्णालायात 30 मिनिटं थांबली… कोणी मला भेटू देईल याच आशेवर मी थांबली होती… पण आमची शेवटची भेट झालीच नाही.’ असं मुमताज म्हणाल्या.

अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासाठी व्यक्त केलं दुःख

मुमताज यांनी हेमा मालिनी यांच्यासाठी दुःख देखील व्यक्त केलं. ‘मला त्याचं कुटुंब आणि हेमा यांच्यासाठी प्रचंड दुःख होत आहे… त्यांना हे नुकसान खूप जाणवत असेल. हेमा, धर्मेंद्र यांच्यावर खरोखर प्रेम करत होत्या.”

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा