
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan)यांच्या घरातले सगळेच फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित नाव आहेत. स्वत: बिग बी, जया बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या हे तर या क्षेत्रात आहेतच. पण आता अमिताभ बच्चन यांचा नातू, त्यांची नुलगी श्वेता नंदा हिचा मुलगा अगस्त्य (Agstya Nanda) यानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 1 जानेवारीला रिलीज झालेल्या ‘इक्कीस’मधून त्याने मोठ्या पडद्यावर डेब्यू केलं असून ही बच्चन कुटुंबातील तिसरी पिढी मनोरंजन क्षेत्रात उतरल्याचे दिसत आहे. मात्र नुकतंच अगस्त्य याने बच्चन कुटुंबाचा वरसा पुढे नेण्याबाबत असं वक्तव्य केलं, ज्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं असून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. अगस्त्यच्या या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
अगस्त्य नंदा याने नुकताच “इक्कीस” चे दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि सह-अभिनेत्री सिमर भाटिया यांच्यासोबत आयएमडीबीसाठी झालेल्या संभाषणात भाग घेतला. बच्चनसारख्या प्रतिष्ठित चित्रपट कुटुंबातून आल्यामुळे येणाऱ्या दबावांबद्दल त्यावेळी अगस्त्यला विचारण्यात आलं. मात्र त्याच वेळी अगस्त्यने थेट उत्तर दिलं. माझं आडनाव नंदा आहे आणि मी माझ्या वडिलांचा वारसा पुढे नेण्यावर माझा विश्वास आहे, असं त्याने स्पष्टच सांगितलं.
‘तो माझा वारसा नाही, माझं आडनाव नंदा आहे…’
तू दोन्हीकडून मोठ्या प्रतिष्ठित कुटुंबातून येतोसं. दोन्ही कुटुंब (बच्चन आणि कपूर) अतिशय प्रतिष्ठित आहेत. तुझ्यावर त्याचा दबाव आहे का ? असा सवाल श्रीराम राघवन यांनी अगस्त्यला विचारला. त्यावर त्याने थेट शब्दांत उत्तर दिलं. ” (त्या गोष्टचा, नावाचा) मी जराही दबाव जाणवून घेत नाही, कारण तो माझा वारसा नाही. माझं आडनाव नंदा आहे, कारण सर्वात पहिले मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे. त्यांना माझा अभिमान कसा वाटेल याचा मी विचार करत असतो. तो वारसा मी अगदी गांभीर्याने घेतो” असं अगस्त्यने नमूद केलं.
पुढे अगस्त्य म्हणाला, ” माझ्या कुटुंबातील इतर सदस्य, जे अभिनेते-अभिनेत्री आहे, मला त्यांचं काम आवडतं, मी त्यांच्या कामचां कौतुक करतो. पण मी त्यांच्यासारखा कधी बनू शकेन असं मला वाटत नाही. त्यामुळे त्याबद्दल विचारं करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे” असंही मत त्याने व्यक्त केलं.
1 जानेवारी 2026 ला रिलीजा झालेला ‘इक्कीस’ हा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अगस्त्यने परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपालची भूमिका केली आहे. सिमर भाटिया, धर्मेंद्र आणि जयदीप अहलावत यांचीही चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.