AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही मुलगी डोक्यातच जाते..; मायरा वायकुळच्या मुलाखतीवर का भडकले नेटकरी?

प्रसिद्ध बालकलाकार मायरा वायकुळ तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. मायराच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या मैत्रिणीविषयी सांगते. परंतु ज्याप्रकारे ती बोलते, त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

ही मुलगी डोक्यातच जाते..; मायरा वायकुळच्या मुलाखतीवर का भडकले नेटकरी?
मायरा वायकुळImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2025 | 12:31 PM
Share

सोशल मीडिया, मालिका आणि चित्रपटांमधून बालकलाकार मायरा वायकुळ घराघरात पोहोचली. मायराने फार कमी वयात लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. परंतु या सर्वांत कुठेतरी तिचं बालपण हरवत चाललंय, असं नेटकरी सतत म्हणतात. मायराला आणि तिच्या आईवडिलांना त्यावरून अनेकदा ट्रोलसुद्धा केलं जातं. लहानपणीच ती मोठ्यांसारखी बोलते आणि वागते, तिचं बालपण हरवलंय, अशी टीका नेटकरी करतात. सध्या मायराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या शाळेतल्या एका मैत्रिणीबद्दल बोलताना दिसतेय. परंतु ज्याप्रकारे ती बोलते, ते पाहून नेटकरी पुन्हा तिला ट्रोल करू लागले आहेत.

काय म्हणाली मायरा?

“माझी एक मैत्रीण होती, जी ग्रेड वनपासून माझ्यासोबत होती. तिची वागणूक खूप बदलली. ती माझ्याशी खूप वाईट वागते. मी तिच्याशी अजून तशी नाही वागत. डॅडी मला असंच सांगत आले की, ती जर तुझ्याशी अशी वागत असेल आणि तू पण तिच्यासारखीच वागलीस, तर तुझ्यात आणि तिच्यात काय फरक राहणार”, असं मायरा या मुलाखतीत सांगते. त्यावर मुलाखत घेणारी व्यक्ती तिला सांगते, “मी तुला यावर एक वेगळा दृष्टीकोन सांगू का? कदाचित त्या मुलीचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील.” या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतक्या कमी वयात आयुष्य आणि प्रॉब्लेम्स याविषयी काय ताण द्यायचा, असं नेटकरी म्हणत आहेत.

या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी मायरा आणि तिच्या आईवडिलांना खूप ट्रोल केलंय. ‘वेळेच्या आधी आणि प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी किंवा यश मिळालं की असं होतं’, असं एकाने म्हटलंय. तर ‘घरूनच वाचून निघते वाटतं स्क्रिप्ट’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘ही मुलगी डोक्यातच जाते. वय काय आणि वागते काय? आमच्या आईवडिलांना आम्हाला हाणून काढलं असतं अशा चर्चा केल्या तर’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

‘करत असेल अ‍ॅक्टिंग चांगली पण जन्माला आल्यापासूनच रील्स आणि मग अ‍ॅक्टिंग यात या पोरीचं बालपण प्रौढ झालं. ती कधीच बालिश बोलत नाही. खूपच अति मॅच्युअर मुलीप्रमाणे वागत असते. जे तिच्या वयाला बिलकुल चांगलं नाही. पण हिच्या पालकांना हे कळत नाहीह. तिच्या भविष्यासाठी हे चांगलं नाही,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली.

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर….

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video.

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी.

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?.

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?