नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ लवकरच प्रदर्शित होणार, ओटीटी की थिअटर?; मंजुळेंनी अखेर पडदा उघडला!

कोरोनाचं संक्रमण अजूनही देशात असल्यामुळे एखादा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे.

नागराज मंजुळेंचा झुंड लवकरच प्रदर्शित होणार, ओटीटी की थिअटर?; मंजुळेंनी अखेर पडदा उघडला!
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 5:50 PM

मुंबई – अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अनेक सिनेमे लवकरचं रिलीज होणार असल्याची माहिती मिळतं आहे. कारण कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक सिनेमे रिलीज झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे झुंड (Jhund) हा आहे. या चित्रपटाचे डायरेक्शन नागराज मंजुळे (nagraj manjule) यांनी केले असल्यामुळे चित्रपट कधी रिलीज होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही दिवसात झुंड चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याची चर्चा होती, परंतु सिनेमा कुठं रिलीज होणार नागराज मंजुळे यांनी स्पष्टचं सांगितले आहे.

मंजुळेंनी भूमिका स्पष्ट केली

कोरोनाचं संक्रमण अजूनही देशात असल्यामुळे एखादा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. तेचं मतं नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं आहे. झुंड या चित्रपटाची अनेकजण वाट पाहत आहेत, कारण त्या अमिताभ बच्चन यांनी काम केलं आहे. मात्र योग्य वेळ आल्यानंतर झुंड चित्रपट आम्ही रिलीज करू असं स्पष्ट केलं आहे. सद्या सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. हा चित्रपट थिअटरला रिलीज व्हावा अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे योग्यवेळी तो रिलीज करण्यात येईल असं मंजुळेंनी सांगितलं. त्यांनी हिंदूस्थान टाईम्सला एक मुलाखत दिली होती, त्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यामुळं लोकांची उत्सुकता वाढली

या चित्रपटात नेमक्या किती भूमिका आहेत, तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम केलंय, त्यामुळं लोकांची उत्सुकता वाढली आहे. आत्तापर्यंत मराठी अनेक चित्रपट हीट देणा-या मंजुळे यांच्या हिंदी चित्रपटात वेगळं काय पाहायला मिळणार याकडे सगळ्याचे डोळे लागले आहेत. कोरोनाचं संक्रमण कमी झाल्यानंतर हा चित्रपट तुम्हाला थिअटरला बघायला मिळेल.

ही भूमिका केल्याची चर्चा 

झुंड सिनेमात अमिताभ बच्चन यांनी ‘स्लम सॉकर’चे संस्थापक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे. तसेच बच्चन एका प्राध्यापकाच्या भुमिकेत पाहायला मिळतील, झोपडपट्टीतील मुलांना एकत्र करून ते फुटबॉलची एक टीम तयार करतात, आणि त्यांना जगण्याचा मार्ग दाखवतात अशी चर्चा आहे.

Katrina Kaif Education : कॅटरीना शाळेत जाऊ शकली नाही, पण फाडफाड इंग्रजी बोलते! नेमकं कारण काय ?

धनुष-ऐश्वर्याचा काडीमोड, पण राहतात एकत्रच एका हॉटेलात! रजनीकांतच्या व्याहींनी सांगितलं कारण

photos : साडीतही मोनालिसाचा धुमाकूळ, फोटो झाले व्हायरल; तुम्ही फोटो पाहिले का ?