Mahesh Manjrekar: त्या दिवशी सेटवर नाना आणि तनुश्रीमध्ये नेमकं काय झालं? महेश मांजेकरांनी सर्वच सांगितलं
Mahesh Manjrekar: 2008 साली एका सीनवरुन नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यामध्ये वाद सुरु झाला. हा वाद कित्येक वर्ष सुरू होता. आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जवळचे अभिनेते महेश मांजरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीमधील अतिशय दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर यांचे निधन झाले. नानांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने अनेक आरोप केले. 2008 साली एका सीनदरम्यान नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. आता यावर दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी वक्तव्य केले आहे.
महेश मांजरेकर यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच त्यांनी तनुश्री दत्ताने नानांवर केलेल्या आरोपांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यादिवशी सेटवर काय घडलं होतं हे महेश मांजरेकर यांनी सांगितले आहे. महेश मांजरेकर म्हणाले की, ‘काहीही करुन माझ्याकडे बघा अशीही काही लोक असतात. सगळ्यांनी कौतुक केलं आणि एकाने केलं नाही की त्याच्याकडे बघतात की नाही. तर त्यामुळे ते ठिक आहे. प्रत्येकजण म्हणतो ते परत जुनं प्रकरण काढतात. अरे त्याला किती वर्ष झाली. मला माहितीये ना नाना. त्या सेटवर काय झालं? तिकडे कोण कोण होते? सगळ्यांनी मला सांगितलं. पण आता ते… काय होतं ना लोक त्यालाही हायलाईट करायला तयार असतात. उगाच… फॉर नो रिझन त्याने खूप सफर केलं आहे त्यावेळेला. काहीच कारण नसताना.’
वाचा: या सीनवरून सुरु झाला नाना पाटेकर आणि तनुश्रीमध्ये वाद, अखेर व्हिडीओ समोर आला
यावर प्रत्येकाचे मत आहे…
पुढे ते म्हणाले, ‘त्या सेटवर असलेले सगळेजण मला माहिती आहेत. त्यांनी सांगितलं काहीही झालं नव्हतं. पण मला असे वाटते की आता त्याकडे दुर्लक्ष करा… ठिक आहे… त्याच्यावर फार विचार करायचा नाही. यावर प्रत्येकाचे मत आहे आणि प्रत्येकाचे वेगळे मत आहे. राग येतो पण काय करणार? त्याला इलाज काय आहे?’
2008 सालचा वाद
नाना पाटेकर आणि तनुश्री दत्तामध्ये 2008 साली एका आयटम साँगसाठी एकत्र दिसले होते. या वेळी नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. त्यावर नाना यांनी अनेकदा असे काहीच घडले नाही असे म्हटले होते. आता महेश मांजरेकर यांनी देखील त्या दिवशी सेटवर काहीच घडले नव्हते असे सांगितले आहे.