Nana Patekar: आमच्या दोघांची ती इच्छा अपूर्णच राहिली…नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्कारानंतर तुकाराम मुंढे यांचा मोठा खुलासा

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे काल निधन झाले. पुणे येथे अंत्यदर्शनासाठी काल अनेक लोक जमले होते. तुकाराम मुंढे ही काल अंत्यदर्शनासाठी आले होते तेव्हा नानांविषयी काय म्हणाले ते पाहा...

Nana Patekar: आमच्या दोघांची ती इच्छा अपूर्णच राहिली...नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्कारानंतर तुकाराम मुंढे यांचा मोठा खुलासा
| Updated on: Oct 09, 2026 | 9:11 AM

Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर काल रात्री पुण्यातील डोणजे गावात अंत्यसंस्कार पार पडले. मराठी रंगभूमी आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतल्या या दिग्गज अभिनेत्याने वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 8 ऑक्टोबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले. नाना पाटेकरांच्या अकाली एक्झिटने मनोरंजनसृष्टीला मोठा झटका बसला आहे.

गोव्यातील दोनापावलामधील निवासस्थानी ५:२० वाजता नाना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर नाना पाटेकरांचे पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सने गोव्याहून पुणे विमानतळावर आणले. पुणे विमानतळावरून त्यांचे पार्थिव डोणजे गावात आणले गेले. तिथेच त्यांच्यावर राज्यातील अनेक नेतेमंडळी, नातेवाईक आणि नानांच्या असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आएएस अधिकारी तुकाराम मुंढे देखील नाना पाटेकरांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले.

Loading...

नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी कळताच तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर रात्री तुकाराम मुंढे पुण्यात नाना पाटेकरांच्या अंत्यदर्शनासाठीही पोहोचले. यावेळी तुकाराम मुंढे अंत्यत भावनिक झाल्याचे दिसून आले. यावेळी ते म्हणाले की, “नाना पाटेकर यांची निधनाच्या अवघ्या 8 दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. यावेळी फोन ठेवताना नानांनी “लव्ह यू, बाळा” असे म्हटले होते, जे आयुष्यभर माझ्यासोबत राहील अशी भावना मुंढे यांनी व्यक्त केली.

“ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते. आमचा सतत संवाद व्हायचा. आमचे शेवटचे बोलणे अवघ्या एका आठवड्यापूर्वीच झाले होते आणि नेहमीप्रमाणेच ते खूप छान होते. त्यांनी माझ्या कुटुंबाची आणि मुलांची विचारपूस केली—ते कसे आहेत, हे जाणून घेतले. फोन ठेवताना ते  म्हणाले ‘लव्ह यू, बाला.’ मला वाटते, हाच तर खरा ‘नाना’ होता—ज्यांच्या मनात सर्वांबद्दल प्रेम होते. ते सदैव आमच्यासोबत आणि माझ्यासोबत राहतील…  एक गोष्ट जी अपूर्णच राहिली, ती म्हणजे आम्ही आखलेली एक योजना. त्या कार्यक्रमाची तारीख निश्चित झाली नव्हती, पण एका सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकाच मंचावर येणार होतो, जिथे ते माझी मुलाखत घेणार होते. दुर्दैवाने, ते घडू शकले नाही…”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us