दारु सोडली सिगारेटचं व्यसन लागलं, दिवसाला नाना पाटेकर 60-60 सिगारेट प्यायचे

नाना पाटेकर हे त्यांच्या आरोग्याची भरपूर काळजी घ्यायचे. परंतु वयाच्या 56 वर्षांपर्यंत दिवसाला 60 सिगारेट ओढायचे. परंतु काही दिवसानंतर सिगारेट ओढणे बंद केले.

दारु सोडली सिगारेटचं व्यसन लागलं, दिवसाला नाना पाटेकर 60-60 सिगारेट प्यायचे
nana patekar
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 2:41 PM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. नाना पाटेकर यांनी अभिनय क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. वयाची सत्तरी पार केलेल्या नाना पाटेकरांचा फिटनेस चांगला होता. त्यांच्या फिटनेसची जोरदार चर्चा व्हायची. नाना पाटेकरांचं आज गुरुवारी सकाळी 5.20 वाजता निधन झालं. त्यांना कार्डियक अरेस्ट आला होता. त्यांना जवळपास 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला. परंतु डॉक्टर त्यांचा प्राण वाचवू शकले नाहीत. या प्रकरणी मेडिको लीगल केस दाखल करण्यात आली आहे.

नाना पाटेकर हे त्यांच्या फिटनेसबाबत सजग होते. फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते शॉर्ट्सवर दिसत आहेत. वयाच्या 75 व्या वर्षी ते सहजपणे व्यायाम करताना दिसत आहेत. नानांनी 15 ट्रायसेप डिप्स  मारल्याचे सांगितले. त्यांनी व्हिडिओ उशिरा सुरू केल्याचेही सांगितले.  अतुल कसबेकर यांनी नाना पाटेकर यांच्या फिटनेसचं भरपूर कौतुक केलं होतं. या व्हिडिओनंतर नाना पाटेकर यांच्या फिटनेसची जोरदार चर्चा झाली होती.  नाना पाटेकर हे दिवसाला दीड ते दोन तास व्यायाम करायचे. यात सूर्य नमस्काराचाही समावेश आहे. ते आरोग्याची फार काळजी घ्यायचे.

Loading...

नाना पाटेकरांनी कधीपासून फिटनेसवर भर दिला?

नाना हे सुरुवातीला आरोग्याबाबत शिस्तबद्ध नव्हते. 2015 साली दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ध्रूम्रपानाच्या सवयीविषयी सांगितले होते. ते एकेकाळी दिवसाला 60 सिगारेट ओढायचे. ते जवळपास 56 व्या वर्षांपर्यंत सिगारेट ओढत होते. परंतु एका घटनेनंतर त्यांनी सिगारेट ओढणे बंद केले. या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले होते, माझ्या आयुष्यातील एका घटनेने आयुष्य दु:खामध्ये बुडालो होतो. ते दु:ख पचवणे कठीण जात होते. त्यावेळी सिगारेटचं व्यसन जडलं. त्यावेळी दिवसाला जवळपास ६० सिगारेट ओढायचो. मी आंघोळ करतानाही एक सिगारेट ओढायचो. सिगारेटच्या धुरामुळे कोणीही माझ्या कारमध्ये बसत नव्हते. मी दारू प्यायचो नाही, परंतु सिगारेट खूप ओढायचो. परंतु वाढत्या वयानुसार राग आणि सवयीवर नियंत्रण मिळवलं’. तत्पूर्वी, नाना पाटेकर यांच्या मृतदेहावर पुण्यातील डोणजे गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  डोणजे गावातील नानाचीवाडी या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली आहे.  डोणजे ग्रामस्थ आणि नाम फाउंडेशनच्या वतीने तयारी सुरू करण्यात येत आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us