AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : 35 वर्ष वेगळं राहूनही नानांनी या एका कारणासाठी नीलकांती यांना दिला नाही घटस्फोट? त्यासाठी मनीषालाही सोडलं

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी एका जुन्या मुलाखतीत पत्नी नीलकांती यांच्याबद्दल भाष्य केलेलं.

Nana Patekar : 35 वर्ष वेगळं राहूनही नानांनी या एका कारणासाठी नीलकांती यांना दिला नाही घटस्फोट? त्यासाठी मनीषालाही सोडलं
| Updated on: Oct 10, 2026 | 9:05 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू आला. नाना यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकर त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होते. नाना पाटेकर यांचं लग्न नीलकंठ पाटेकर यांच्याशी झालं होतं. मात्र, त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आल्या. नाना पाटेकर आणि नीलकंठ पाटेकर ३५ वर्षे वेगळे राहिले, पण त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही.

नाना पाटेकर यांचं नाव अभिनेत्री मनीषा कोईरालासोबतही जोडलं गेलं होतं. त्यांनी ‘खामोशी’, ‘अग्नि साक्षी’ आणि ‘युगपुरुष’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘युगपुरुष’ हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. मनीषा आणि नाना यांची पडद्यावरील जोडी खूप गाजली होती. त्यांच्या वयात १९ वर्षांचं अंतर होतं. ‘अग्नि साक्षी‘ सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला एकमेकांच्या प्रेमात पडले. कालांतराने, मनीषानं नाना पाटेकर यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, नाना पाटेकर यांनी लग्नासाठी नकार दिला. माझ्या पत्नीला कायदेशीररित्या घटस्फोट देण्यासाठी माझ्याकडे कोणतंही ठोस कारण नाही असं नानांनी मनीषाला सांगितलं.

पत्नीबद्दल काय म्हणालेले नाना पाटेकर?

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर नीलकांती यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, ‘ती नाटकात काम करायची आणि बँकेत अधिकारी होती. आम्हाला एका शोचे ५० रुपये मिळायचे आणि तिला अडीच हजार रुपये पगार होता. मी १५-२० शो केले तर ७५० रुपये मिळायचे. पूर्ण महिना ३० शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरी फक्त १५०० मिळायचे. तिने मला म्हटलं की, तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. माझ्यावर तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. यश मिळेल की नाही हे त्यावेळी माहीत नव्हतं’

अनेक मुलाखतींमध्ये नाना पाटेकर यांनी पत्नीचं कौतुक केलं होतं. कठीण काळात तिनं खूप साथ दिली, असं नाना म्हणाले होते. याच एका कारणामुळे नाना पाटेकर यांनी नीलकांती यांच्यापासून 35 वर्षे वेगळं राहूनही घटस्फोट घेतला नाही.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे