Nana Patekar: नाना नसता तर त्या लोकांनी मला मारलंच असतं..; त्या रात्री नेमकं काय घडलं? अशोक सराफ यांनी सांगितलेला किस्सा

अशोक सराफ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितला होता. आजही तो प्रसंग आठवला की अंगारा शहारा येतो.. अशा शब्दांत अशोक सराफ त्यांनी त्या घटनेचं वर्णन केलं होतं.

Nana Patekar: नाना नसता तर त्या लोकांनी मला मारलंच असतं..; त्या रात्री नेमकं काय घडलं? अशोक सराफ यांनी सांगितलेला किस्सा
Ashok Saraf and Nana Patekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2026 | 9:32 AM

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांची माणुसकी आणि प्रसंगावधानाची अनेक उदाहरणं आज समोर येत आहेत. त्यापैकीच एक धक्कादायक किस्सा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितला आहे. ‘हमीदाबाईंची कोठी’ या गाजलेल्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाना पाटेकरांनी अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून अशोक सराफ यांना वाचवलं होतं. ‘हमीदाबाईंची कोठी’ हे अशोक सराफ यांच्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या नाटकांपैकी एक होतं. या नाटकात नाना पाटेकर, अशोक सराफ, नीना कुळकर्णी, भारती आचरेकर, प्रदीप वेलणकर यांसारखे कलाकार होते. एका गावात या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र तिथे थिएटरची सोय नसल्याने एका मिलमध्ये तात्पुरता स्टेज उभारण्यात आला होता.

नाटकाची खरी अडचण प्रयोग सुरू झाल्यानंतर समोर आली. ‘हमीदाबाईंची कोठी’मध्ये कलाकारांना खाली बसून संवाद सादर करावे लागत होते. मात्र स्टेजची उंची आणि व्यवस्था योग्य नसल्यामुळे मागच्या रांगेतील प्रेक्षकांना काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे काही वेळातच प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली. अखेर प्रयोग थांबवावा लागला. प्रेक्षकांना नाटक उभं राहून करण्याची अपेक्षा होती. मात्र तसं करणं या नाटकाच्या स्वरूपामुळे शक्य नव्हतं. यावरून वाद वाढत गेला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. खुर्च्या तोडण्यात आल्या, ट्युबलाइट्स फोडण्यात आल्या आणि नाटकाच्या ड्रायव्हरलाही मारहाण करण्यात आली. काही लोक स्टेजच्या दिशेने येऊ लागले.

Loading...

या सगळ्या गोंधळात नाना पाटेकरांनी प्रसंगावधान राखलं. अशोक सराफ हे त्या काळात अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे संतप्त जमावाचा पहिला रोख त्यांच्याकडे होऊ शकतो, हे नानांच्या लक्षात आलं. त्यांनी अशोक सराफ यांना तातडीने मागच्या बाजूने बाहेर काढलं. दोघेही अंधारातून आणि चिखलातून धावत मुख्य रस्त्यावर पोहोचले. तिथे एक रिक्षा मिळाली. मात्र रिक्षाचालक वयस्कर असल्यामुळे नानांनी त्याला मागे बसवलं आणि स्वतः रिक्षा चालवत अशोक सराफ यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. त्यांना रेस्ट हाऊसमध्ये पोहोचवल्यानंतर नाना पुन्हा नाटकाच्या ठिकाणी गेले आणि इतर कलाकारांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

अशोक सराफ यांनी या घटनेची आठवण सांगताना नाना नसते तर त्या रात्री आपल्यासोबत अतिशय गंभीर घटना घडली असती, अशी भावना व्यक्त केली होती. त्यांच्या या आठवणीमधून नाना पाटेकरांचा धाडसी स्वभाव आणि मित्रांसाठी कोणत्याही परिस्थितीत उभं राहण्याची वृत्ती पुन्हा समोर येते. रंगमंचावरचा हा प्रसंग त्यांच्या आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीतील एक अविस्मरणीय अध्याय ठरला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us