
भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या याची पहिली पत्नी नताशा स्टेनकोविच घटस्फोटाच्या दीड महिन्यांनंतर मुंबईत परतली आहे. सांगायचं झालं तर, नताशा हिने 15 जुलै रोजी भारत सोडून मुलासोबत मायदेशी परतली होती. त्यानंतर 18 जुलै रोजी हार्दिक आणि नताशा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर रविवारी नताशा पहिल्यांदा भारतात परतली आहे. नताशा हिने खास फोटो देखील पोस्ट केला आहे.
सोमवारी सकाळी 6 वाजता नताशा मुंबईत दाखल झाली. अभिनेत्री फोटो देखील पोस्ट केले आहेत. मुंबईच्या रस्त्याचा फोटो नताशा हिने पोस्ट केला आहे. तर एका फोटोमध्ये अभिनेत्री विमानात बसलेली दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा आणि हार्दिक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
नताशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 2012 मध्ये मुंबईत अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होती. भारतात आल्यानंतर नताशा हिला दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ सिनेमात काम करण्याती संधी मिळाली. त्यानंतर नताशा अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस 8’ शोमध्ये दिसली. नताशा हिने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
झगमगत्या विश्वात काम करत असताना अभिनेत्री 2020 मध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर नताशा हिने मुलाला देखील जन्म दिला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
नताशा हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे 20 कोटी रुपयांची संपत्ती आहे. डान्स, सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या माध्यमातून अभिनेत्री कमाई करते. नताशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.