Salman Khan: ‘या’ महिलेमुळे सलमान खानचं आयुष्य झालंय उद्ध्वस्त, भाईजानच्या वडिलांकडून सत्य समोर

Salman Khan: 'त्या एका महिलेमुळे सलमान खान याचं संपूर्ण उद्ध्वस्त झालंय...', भाईजनचे वडील सलीम खान यांच्याकडून सत्य अखेर समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Salman Khan: 'या' महिलेमुळे सलमान खानचं आयुष्य झालंय उद्ध्वस्त, भाईजानच्या वडिलांकडून सत्य समोर
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 8:37 AM

Salman Khan Love Life: अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खान एकटंच आयुष्य जगत आहे. सलमान खान याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. पण अभिनेत्याचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ… यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींना सलमान याने डेट केलं आहे. पण प्रत्येकीने दुसऱ्यासोबत संसार थाटला. अशात सलमान खान याचं नुकसान नक्की कोणामुळे झालं… यावर अभिनेत्याचे वडील सलीम खान यांनी केला.

सलमान खान याचं जे काही नुकसान झालं त्याला जबाबदार त्याची आई सलमा खान आहे… असं वक्तव्य सलीम खान यांनी केलं होतं. ‘सलमान खान याचं लग्न कधीच होऊ शकलं नाही कारण सलमान ज्या कोणत्या मुलीला डेट करायचा, त्या मुलीमध्ये सलमान त्याच्या आईला पाहायचा…’

‘सलमानच्या अनेक गर्लफ्रेंड झाल्या आहेत. पण तो कायम मुलींमध्ये स्वतःच्या आईला पाहायचा. जेव्हा सलमान असं करायचा तेव्हा ती मुलगी पळून जायची… आई प्रमाणे बायको देखील त्याच्यावर प्रेम करेल.. अशी सलमानची इच्छा होती. पण त्याचं कोणतंच नातं फार काळ टिकलं नाही.’ असं देखील सलीम खान म्हणाले.

सलमान खान याच्या एक्स-गर्लफ्रेंड

सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. ज्यामध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री संगीत बिजलानी हिचं आहे. संगीता बिजलानी हिच्यासोबत सलमान खान याच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. पण दोघांचं लग्न मोडलं आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले.

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. ‘हम दिल चुके सनम’ सिनेमात ऐश्वर्या – सलमान यांनी पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. पण नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या नात्याचा अंत देखील फार वाईट होता. ऐश्वर्याने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.