‘माझ्या मुलांना 45 दिवसांपासून बंधक बनवलं गेलंय, मी गप्प होतो कारण..’; पत्नीवर भडकला नवाजुद्दीन

'मी आणि आलिया अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आमचा घटस्फोट झाला आहे, पण फक्त मुलांसाठी आम्ही समजूदारपणा दाखवत होतो. हे कोणाला माहित आहे का की माझी मुलं भारतात का आहेत आणि गेल्या 45 दिवसांपासून शाळेत का जात नाहीयेत?'

'माझ्या मुलांना 45 दिवसांपासून बंधक बनवलं गेलंय, मी गप्प होतो कारण..'; पत्नीवर भडकला नवाजुद्दीन
Nawazuddin Siddiqui
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 2:04 PM

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओमध्ये ती तिच्या मुलांसोबत घराबाहेर रडताना दिसतेय. नवाजुद्दीनने तिला घराबाहेर हाकललं, असा आरोप तिने केला. आता या सर्वप्रकरणी नवाजुद्दीनने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित त्याने पत्नीच्या सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकीची पोस्ट-

‘मी मौन बाळगल्यामुळे सर्वत्र मला वाईट ठरवलं जातंय. माझं गप्प राहण्याचं कारण म्हणजे हा सर्व तमाशा (नाटक) कुठेतरी माझी लहान मुलं वाचतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, माध्यमं आणि काही लोकं खरंच एकतर्फी आणि फेरफार करून शूट केलेल्या व्हिडीओच्या आधारावर होत असलेल्या माझ्या चारित्र्याच्या हत्येचा आनंद घेत आहेत.’

हे सुद्धा वाचा

‘माझ्या मुलांना बंधक बनवलं गेलंय’

‘सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की मी आणि आलिया अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आमचा घटस्फोट झाला आहे, पण फक्त मुलांसाठी आम्ही समजूदारपणा दाखवत होतो. हे कोणाला माहित आहे का की माझी मुलं भारतात का आहेत आणि गेल्या 45 दिवसांपासून शाळेत का जात नाहीयेत? दुसरीकडे त्यांच्या अनुपस्थितीसाठी शाळेकडून मला रोज पत्रं पाठवली जात आहेत. माझ्या मुलांना गेल्या 45 दिवसांपासून बंधक बनवलं गेलंय आणि त्यामुळे दुबईतील शाळेत ते हजर राहू शकत नाहीयेत’, असं त्याने लिहिलं आहे.

‘तिला फक्त पैसेच हवे आहेत’

आलियाकडून उपस्थित करण्यात आलेल्या पैशांच्या मुद्द्यावर त्याने पुढे स्पष्ट केलं, ‘गेल्या चार महिन्यांपासून तिने मुलांना दुबईत सोडलं होतं. मात्र आता पैसे मागण्याच्या बहाण्याने तिने मुलांना स्वत:कडे बोलावून घेतलं. शाळेची फी, वैद्यकीय खर्च, प्रवास आणि इतर आरामदायी गोष्टींशिवाय तिला गेल्या दोन वर्षांपासून जवळपास 10 लाख रुपये प्रति महिना दिला जातो. माझ्या मुलांसह दुबईला शिफ्ट होण्यापूर्वी तिला दर महिन्याला 5 ते 7 लाख रुपये दिले जात होते. ती माझ्या मुलांची आई आहे आणि तिला उत्पन्न मिळत राहावं यासाठी मी तिच्या तीन चित्रपटांना कोट्यवधींची आर्थिक मदत केली. माझ्या मुलांसाठी ज्या आलिशान गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या, त्यासुद्धा तिने स्वत:च्या खर्चासाठी विकल्या आहेत. मुंबईतील वर्सोवा याठिकाणी मी मुलांसाठी आलिशान सी-फेसिंग अपार्टमेंट विकत घेतला होता. माझी मुलं लहान असल्याने आलियाला त्या अपार्टमेंटची सह-मालक बनवण्यात आलं होतं. माझी मुलं दुबईत भाड्याच्या घरात राहत होती, तिथेही ती आरामात राहत होती. तिला फक्त पैसेच हवे आहेत आणि म्हणूनच तिने माझ्यावर आणि माझ्या आईवर अनेक खटले दाखल केले आहेत. हा तिचा जणू नित्यक्रमच झाला आहे. यापूर्वीही तिने हेच केलं होतं आणि तिच्या मागणीनुसार पैसे दिल्यानंतर केस मागे घेतली होती.’

‘माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा हेतू’

आपल्या दोन मुलांविषयी त्याने लिहिलं, ‘माझी मुलं जेव्हा कधी सुट्टीत भारतात यायची, तेव्हा ते फक्त त्यांच्या आजीकडेच राहायचे. त्यांना घराबाहेर कोणीही कसं हाकलून देणार? मी स्वत: त्यावेळी घरात नव्हतो. जर ती कोणत्याही गोष्टीवरून व्हिडीओ बनवत असते तर मग तिने घरातून हाकलल्याचा व्हिडीओ का नाही बनवला? या नाटकात तिने माझ्या मुलांनाही ओढलं आहे आणि ती फक्त मला ब्लॅकमेल करण्यासाठी, माझी प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी, माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व करतेय. माझं करिअर उद्ध्वस्त करणं आणि तिच्या अयोग्य मागण्या पूर्ण करून घेणं हाच तिचा यामागचा उद्देश आहे.’

‘माझ्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन’

‘कोणत्याही पालकांना त्यांच्या मुलांनी शिक्षण चुकवावं आणि त्यांच्या भविष्यात अडथळा निर्माण व्हावा, असं कधीच वाटणार नाही. ते नेहमीच त्यांना सर्वोत्कृष्ट गोष्टी देण्याचा प्रयत्न करतील. आज मी जे काही कमावतोय ते माझ्या मुलांसाठीच आहे आणि कोणतीही व्यक्ती याला बदलू शकत नाही. माझं शोरा आणि यानीवर खूप प्रेम आहे. त्यांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन. मी आतापर्यंत सर्व खटले जिंकले आहेत आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एखाद्याला मागे खेचणं हे प्रेम नसतं पण त्याला योग्य दिशेने उडू देणं हे खरं प्रेम असतं’, असंही त्याने लिहिलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.