नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी निलकांती यांची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांमध्ये व्यक्त केल्या भावना
नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी नीलकांती पाटेकर यांची पहिली प्रतिक्रिया; तीन शब्दांत व्यक्त केल्या भावना. नेमकं पोस्टमध्ये काय?

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने चाहते आणि इंडस्ट्रीमधील कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. या दुःखद प्रसंगानंतर नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांच्या या पोस्टमधील तीन शब्द सध्या चर्चेत आले आहेत.
‘एक शब्द… निःशब्द…’
दिलेल्या माहितीनुसार, नीलकांती पाटेकर यांनी फेसबुकवर ‘एक शब्द… निःशब्द…’ अशी मोजक्या शब्दांत पोस्ट शेअर केली आहे. या शब्दांतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. पतीच्या निधनानंतर त्यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया भावनिक असल्याचे म्हटले जात आहे.
नाना पाटेकर आणि नीलकांती पाटेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही वर्षांपासून विविध चर्चा होत होत्या. मात्र, दोघांमधील कौटुंबिक नात्याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीनंतर नीलकांती यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंत गाजवली कारकीर्द
नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.
‘अर्ध सत्य’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘खामोशी’ आणि ‘अब तक छप्पन’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. गंभीर, आक्रमक आणि संवेदनशील भूमिका प्रभावीपणे साकारणाऱ्या नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवला.
1978 मध्ये लग्न
नाना पाटेकर आणि निलकांती पाटेकर यांचं लग्न 1978 मध्ये झालं. निलकांती या बँकेत अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यांना नाटकाची आवड होती. याचमुळे त्यांची नाना पाटेकर यांच्याशी भेट झाली. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यावेळी नाना पाटेकर यांचं लग्न 750 रुपयांमध्ये झालं होतं. लग्नानंतर देखील निलकांती यांना नोकरी करण्यासाठी नानांनी पाठिंबा दिला होता. पत्नीचे खूप उपकार आहेत, तिच्यामुळेच या क्षेत्रात करिअर करू शकलो, असं नाना पाटेकर म्हणाले होते.