अनुपम खेरसोबत गिव्ह अँड टेकचं नातं; नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा

नीना गुप्ता आणि अनुपम खेर लवकरच ‘मेट्रो… इन दिनों’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. दरम्यान एका मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी हा खुलासा केला आहे.

अनुपम खेरसोबत गिव्ह अँड टेकचं नातं; नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा
Anupam kher and neena Gupta
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 07, 2025 | 6:39 PM

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या कायमच चर्चेत असतात. वयाची 50शी ओलांडल्यानंतर ही त्या तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात. नीना यांचा लवकरच ‘मेट्रो… इन दिनों’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्या अनुपम खेर यांच्यासोबत दिसणार आहेत. प्रमोशन दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत. त्यांनी थेट ‘अनुपम खेरसोबत गिव्ह अँड टेकचं नातं’ असे म्हटले आहे.

नीना गुप्ता यांनी नुकताच IANSला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनुपम खेर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. त्यांनी सांगितलं की त्यांचं आणि अनुपम यांचं ‘गिव्ह अँड टेक’ म्हणजेच एकमेकांना साथ देणारं आणि लेन-देनाचं नातं आहे. जेव्हा नीना गुप्ता यांना अनुपम यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव किती समाधानकारक होता, असं विचारलं गेलं, तेव्हा त्या म्हणाल्या, “मी यापूर्वीही अनुपम यांच्यासोबत काम केलं आहे. आम्ही दोघांनी बराच काळ एकत्र थिएटरमध्ये काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी पूर्णपणे समाधानकारक होतं. कलाकार म्हणून आमच्यात चांगला ताळमेळ आहे. आमचं गिव्ह अँड टेकचं नातं आहे.”

वाचा: पहलगाम हल्ल्यामागील ISIमधील त्या व्यक्तीचा पर्दाफाश, ज्योती मल्होत्रालाही तिने केले तयार

भावनिक दृश्यांबद्दल बोलताना नीना गुप्ता यांनी सांगितलं की चित्रपटातील काही दृश्यं खूप भावनिक होती. ती दृश्यं आणखी चांगली करण्यासाठी अनुपम खेर यांनी काही उत्तम सूचना दिल्या होत्या, ज्या खूप प्रभावी ठरल्या. यामुळे ती दृश्ये आणखी खरी वाटू लागली. त्यामुळे ती पात्रं आणि दृश्यं अधिक परिणामकारक झाली.

अनुपम खेर देत होते नीना गुप्ता यांना शानदार कल्पना

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, “अनुपम अचानक काही ना काही शानदार कल्पना घेऊन येत होता, छोट्या-छोट्या बारकाव्यांसह, छोट्या-छोट्या गोष्टी ज्या दृश्याच्या भावनिक भागाला पूर्णपणे बदलून टाकत होत्या. हिच एक गोष्ट होती जी मी अनुपम यांच्यासोबत काम करताना खूप एन्जॉय केली.” अभिनेत्रीने सांगितलं की चित्रपटाचं डबिंग करताना त्यांना जाणवलं की त्यांनी त्यांच्या पात्रात किती काही दिलं आहे.

‘मेट्रो… इन दिनों’ चं शूटिंग वेगवेगळ्या भागांमध्ये झालं

नीना गुप्ता म्हणाल्या, “चित्रपटाचं शूटिंग वेगवेगळ्या भागांमध्ये झालं होतं, त्यामुळे मला त्या वेळी जाणवलं नाही की मी चित्रपटात किती काम केलं आहे. पण जेव्हा मी डबिंग सुरू केलं आणि हे सगळं एकत्र माझ्यासमोर आलं, तेव्हा मला समजलं की मी माझ्या पात्राच्या माध्यमातून चित्रपटात खूप काही केलं आहे!”