
एकेकाळी कपूर कुटुंबाचा गणेशोत्सव संपूर्ण इंडस्ट्रीत प्रसिद्ध होता. कपूर कुटुंबात 5 दिवसांसाठी बाप्पाचं आगमन होतं. यावेळीही कपूर कुटुंबात गणेशाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तसेच पाचव्या दिवशी म्हणजे रविवारी बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळीही रणबीर कपूर गणपती विसर्जनाला आई नीतू कपूरसोबत आलेला दिसला. बाप्पाला निरोप देताना रणबीरने बाप्पाची पूजा केली, हात जोडून त्यांचे आशीर्वाद घेतले, आरती केली.
आरतीवेळी एका वृद्ध माणसाचा धक्का लागताच
यावेळी नीतू कपूर यांनी देखील बाप्पाची आरती केली. यावेळी आरतीवेळी एका वृद्ध माणसाचा धक्का लागताच त्यांनी जे हावभाव केले ते लोकांना आवडले नाहीत. तसेच त्यांनी बाप्पाची आरती करतानाही चूक केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं. खरंतर, नीतू यांनी एका हाताने पूजा थाळी आणि दुसऱ्या हाताने दुपट्टा धरला होता. आणि एका हातानेच बाप्पाची आरती केली. हे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना एका हाताने आरती केल्याबद्दलही सोशल मीडियावर फटकारलं आहे.
Neetu Kapoor Trolled
नीतू सिंगच नाही तर आलिया भट्टलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं
यावेळी फक्त नीतू सिंगच नाही तर आलिया भट्टलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. कारण दरवर्षीप्रमाणे यावेळीही आलिया भट्ट गणपती विसर्जनात सहभागी झालेली दिसली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आलियाला देखील ट्रोल केले आहे.
एका युजर्सने म्हटलं आहे ‘आलिया नेहमीच अशा क्षणांपासून गायब का असते?’ दुसऱ्या व्यक्तीने टिका करत म्हटलं, ‘आलिया भारतीय सण का साजरे करताना दिसत नाही? कारण ती ब्रिटिश नागरिक आहे म्हणून का?’ तर अजुन एकाने लिहिले की, ‘आलिया आली नाही, ती खूप पार्टी करते.’ याशिवाय एका युजरने म्हटले- ‘आलिया गणेश चतुर्थीला सहभागी होत नाही हे दुःखद आहे.’
आलिया दरवर्षी गणपती विसर्जनापासून दूर का राहते?
रणबीर कपूर दरवर्षी त्याची आई नीतू कपूरसोबत गणपती विसर्जन करताना दिसतो. पण आलिया भट्ट नेहमीच गणपती पूजेपासून दूर राहताना दिसली आहे. याहीवेळी तसंच काहिसं दृश्य दिसल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
Aliya Bhatt Trolled
रणबीर कपूरच्या कामाच्या बाबतीत
रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याचे ‘रामायण’, ‘ब्रह्मास्त्र २’ आणि ‘अॅनिमल पार्क’ सारखे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.