Neha Kakkar | गायिका नेहा कक्कर लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करनं पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत दिल्लीतील गुरुद्वारात लग्नगाठ बांधली. (Neha kakkar Got married to Rohanpreet Singh)

  • Updated On - 7:30 pm, Sat, 24 October 20
Neha Kakkar | गायिका नेहा कक्कर लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लग्नबंधनात अडकली. पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत पंजाबी पद्धतीनं गुरुद्वारात लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गुलाबी रंगाच्या लग्नाच्या पोशाखात दोघेही अत्यंत देखणे दिसत आहेत. ( Neha kakkar Got married to Punjabi singer Rohanpreet Singh)

गेले अनेक दिवस दोघांच्या लग्नाची चर्चा होती, अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते मात्र नेहानं चाहत्यांसाठी लग्नाचं सरप्राईजच ठेवलं होतं. नुकतच रिलीज झालेल्या ‘नेहु दा ब्याह’ या गाण्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा अजूनच रंगली होती. या गाण्यात नेहासोबत गायक रोहनप्रीतही झळकला होता. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दाखवण्यात आले होते. त्यामुळे तिचे चाहते पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले होते. गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरंच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा करतेय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.

मात्र खुद्द नेहानं लग्नाच्या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केल्यानंतर तिच्या चाहत्यांना यावर विश्वास बसला .

रिपोर्ट्सनुसार 22 ऑक्टोबरला दोघांनी कार्टात लग्न केल्याची माहिती आहे. तर येत्या 26 ऑक्टोबरला मोहालीमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर तिच्या रिसेप्शन कार्डचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या महिन्यातच नेहा आणि रोहनप्रितनं इन्स्टाग्रामवर आपल्या नात्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. नेहानं इन्स्टाग्रामवर रोहनप्रीतसोबतचा फोटो पोस्ट करत ‘रोहनप्रीत तू माझा आहेस’ असं कॅप्शन दिलं होतं.

संबंधित बातम्या

Photo | नेहाच्या हातावर रोहनप्रीतच्या नावाची मेहंदी, पाहा नेहाच्या मेहंदीचे फोटो

Photo | हळद पिवळी, पोर कवळी, नेहा आणि रोहनप्रीतच्या हळदीचे फोटो

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI