ना मोदी, ना त्रिशा.. थलपती विजय यांना ‘या’ खास व्यक्तीचा फोन; स्पर्धा विसरून दिल्या शुभेच्छा

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर थलपती विजय यांना एका खास व्यक्तीचा फोन आला. या खास व्यक्तीला विजय यांचा प्रतिस्पर्धी मानलं जातं. त्यामुळे स्पर्धा बाजूला ठेवून शुभेच्छा देण्यासाठी त्याने कॉल केल्याने चाहतेही खुश झाले आहेत.

ना मोदी, ना त्रिशा.. थलपती विजय यांना या खास व्यक्तीचा फोन; स्पर्धा विसरून दिल्या शुभेच्छा
नरेंद्र मोदी, थलपती विजय, त्रिशा कृष्णन
Image Credit source: Instagram
| Updated on: May 06, 2026 | 12:16 PM

तमिळनाडूच्या राजकारणात धमारेदार एण्ट्री केल्यानंतर थलपती विजय सतत चर्चेत आहेत. त्यांच्या टीव्हीके पक्षाने तब्बल 108 जागांवर विजय मिळवला आहे. 1967 नंतर तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच तिसरा डीएमके किंवा एआयएडीमके यांच्याशिवाय तिसरा पक्ष सत्तेत येणार आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेकांनी थलपती विजय यांना फोन करून, सोशल मीडियावर पोस्ट लिहून तर काहींनी प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा दिल्या. परंतु यात एका व्यक्तीच्या फोन कॉलने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे हा कॉल कोणत्या मोठ्या नेत्याचा, जवळच्या व्यक्तीचा किंवा गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णनचा नाही, तर एका अशा सुपरस्टारचा आहे, ज्याला बऱ्याच काळापासून विजयचा प्रतिस्पर्धी मानलं जातं.

ऐतिहासिक यशानंतर थलपती विजय यांना एका खास व्यक्तीचा फोन आला. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून सुपरस्टार अजित कुमार आहे. अजित कुमार हे तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार आहेत. त्यांनी विजय यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. या फोन कॉलची इतकी चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून विजय आणि अजित हे तमिळ सिनेसृष्टीतील प्रतिस्पर्धी मानले जातात. परंतु हे दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याचं सांगतात. अजित कुमार यांनी विजय यांना फोन करून हे सिद्ध केलं की पडद्यावर कितीही स्पर्धा असली तरी खऱ्या आयुष्यात दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. या फोनच्या वृत्ताने सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

थलपती विजय आणि अजित कुमार

अजित कुमार आणि थलपती विजय या दोघांची नेहमीच पडद्यावर तुलना व्हायची. या दोघांच्या चाहत्यांमध्येही अनेकदा सोशल मीडियावर ‘वॉर’ पहायला मिळायचा. परंतु विजय यांना शुभेच्छा देत अजित कुमार यांनी चाहत्यांसमोरही मैत्रीचं उत्तम उदाहरण सादर केलं आहे. तमिळनाडूतील 234 जागांपैकी अभिनेता विजय यांच्या टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी फक्त दहा जागा कमी पडत आहेत. या अभूतपूर्व यशानंतर विजय यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. टीव्हीकेवर विश्वास केल्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी राहीन, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तमिळनाडूच्या जनतेचं आणि टीव्हीकेचं अभिनंदन केलं. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिली. तर विजय यांनीही पंतप्रधानांचे आभार मानत सांगितलं की, लोकांचं कल्याण हेच त्यांच्या पक्षाचं एकमेव ध्येय आहे.

Follow Us