कंगना रनौत हिच्या ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर नेपाळी मुलींचा भन्नाट डान्स

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 2:56 PM

'लंडन ठुमकदा' गाण्यावर नेपाळी मुलींनी धरलेला ठेक्याचा सोशल मीडियावर बोलबाला, त्यांच्या डान्ससमोर कंगनाचे ठुमके फिके, व्हिडीओवर अनेक सेलिब्रिंटींची कमेंट

कंगना रनौत हिच्या 'लंडन ठुमकदा' गाण्यावर नेपाळी मुलींचा भन्नाट डान्स
कंगना रनौत हिच्या 'लंडन ठुमकदा' गाण्यावर नेपाळी मुलींचा भन्नाट डान्स

मुंबई : सोशल मीडिया असं एक माध्यम आहे, ज्यावर रोज काही तरी नवीन ट्रेंड होत असून तुफान व्हायरल होतं. सोशल मीडियावर तुम्ही अनेकांना बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना पाहात असाल, पण परदेशात बॉलिवूड गाण्याची क्रेझ पाहायला मिळत असेल तर, ती गोष्टी फार अनोखी असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. ज्यामध्ये नेपाळी मुलींचा एक ग्रुप अभिनेत्री कंगना रनौत स्टारर ‘क्वीन’ (Queen) सिनेमातील ‘लंडन ठुमकदा’ (London Thumakda) गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर नेपाळी मुलींचा बोलबाला दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर द विंग्स या अधिकृत अकाउंटवरुन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. द विंग्स हे इन्स्टा हँडल नेपाळी मुलींचा आहे. या नेपाळी मुली अनेक बॉलिवूड गाण्यावर डान्स करत व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी कंगनाच्या लंडन ठुमकदा गाण्यावर जोरदार ठेका धरत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. सध्या सर्वत्र नेपाळी मुलींच्या डान्सची चर्चा आहे.

व्हिडीओवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. फक्त सोशल मीडिया युजर्सच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील नेपाळी मुलींच्या डान्सचं कौतुक करत आहेत. ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर नेपाळी मुलींनी धरलेला ठेक्याचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायवला मिळत आहे. नेपाळी मुलींच्या डान्ससमोर कंगनाचे ठुमके फिके पडले आहेत.

नेपाळी मुलींचा डान्स नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ शेअर होताच तुफान व्हायरल होत आहे. ‘लंडन ठुमकदा’ (London Thumakda) गाण्यावर रिल तयार करणं मुलींसाठी प्रचंड फायद्याचं ठरलं आहे. कारण आतापर्यंत व्हिडीओवर १३.५ मिलियनपेक्षा जास्त व्हूज आले आहे. सध्या सर्वत्र नेपाळी मुलींच्या डान्सची चर्चा आहे.

अभिनेत्री कंगना रानौत स्टारर ‘क्वीन’ (Queen) सिनेमा २०१४ साली प्रदर्शित झाला. सिनेमात कंगना मुख्य भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मजल मारली. सिनेमातील गाणी आजही चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI