AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धर्मवीर 2’च्या टीझरमधील ती चूक नेटकऱ्यांनी हेरली; ‘त्याऐवजी मालगाडी दाखवली असती..’

नुकताच 'धर्मवीर 2' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या टीझरमधील एक चूक नेटकऱ्यांनी हेरली आहे. प्रसाद ओकच्या पोस्टवर कमेंट करत एका युजरने ही चूक निदर्शनास आणून दिली. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन दिघे साहेब निघतात, तो हा सीन आहे.

'धर्मवीर 2'च्या टीझरमधील ती चूक नेटकऱ्यांनी हेरली; 'त्याऐवजी मालगाडी दाखवली असती..'
'धर्मवीर 2' टीझरImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 10:31 AM

काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर 2’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. मात्र या टीझरमधील एक गोष्ट काहींना खटकली. प्रसाद ओकच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी ही चूक लक्षात आणून दिली. या टीझरमध्ये एक मुस्लिम महिला दिघे साहेबांकडे राखी बांधायला येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात.

महिलांना घेऊन जेव्हा आनंद दीघे निघतात, तेव्हा बाजूने लोकल जाताना दाखवली आहे. ही लोकल दिघे साहेबांच्या काळातली नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘दिघे साहेबांच्या काळात ही लोकल ट्रेन नव्हती जी बॅकग्राऊंडमध्ये दाखवली आहे. त्याऐवजी मालगाडी जाताना दाखवली असती तर बरं झालं असतं. ते व्हिएफएक्सने सहज शक्य होतं. कारण आजकाल बाहेरगावी जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या पण नवीन LHB आहेत, जुन्या ICF नाहीत,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं . ‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे.

‘धर्मवीर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली होती. यामध्ये प्रसाद ओक, क्षितीज दाते, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, अभिजीत खांडकेकर, स्नेहा तरडे, जयवंत आडकर, अंशुमन विचारे यांच्या भूमिका होत्या. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं. अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते. प्रवीण तरडेंनीच ‘धर्मवीर 2’चं लेखन, दिग्दर्शन केलंय. आता या सीक्वेलच्या टीझरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?.
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची...
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची....
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू.
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?.
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल.
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन.