AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोक्यावर टक्कल, बाहेर आलेली ढेरी, सलमानचा धक्कादायक व्हिडीओ समोर, 6 पॅकअ‍ॅब्सवरून भाईजान ट्रोल!

सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या अपयशानंतर नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत होते. पण आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे तर नेटकऱ्यांनी त्याला फेक म्हटलं. एवढंच नाहीतर त्याच्याबद्दल चिंताही व्यक्त केली.

डोक्यावर टक्कल, बाहेर आलेली ढेरी, सलमानचा धक्कादायक व्हिडीओ समोर, 6 पॅकअ‍ॅब्सवरून भाईजान ट्रोल!
salman khan dance videoImage Credit source: TV9 Marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 13, 2025 | 7:08 PM
Share

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतच असतात. त्यात सलमान खानचे नाव तर अस नुकताच सलमान खानचा एक असाच तंच असतं. सलमानचा एक असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्या व्हिडीओमुळे त्याला बरंच ट्रोल करण्यात येत आहे. सलमानचा ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही.

एका व्हिडीओमुळे सलमान खान ट्रोलर्सचं लक्ष्य बनला आहे

दरम्यान 10 मे रोजी जेव्हा भारत-पाकिस्तान तणावादरम्यान युद्धबंदीची घोषणा करण्यात आली, तेव्हा सलमानकडून एक पोस्ट करण्यात आली ज्यामध्ये त्याने लिहिले ‘युद्धविरामासाठी धन्यवाद’. तथापि, काही काळानंतर ही पोस्ट डिलीटही करण्यात आली आणि त्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता पुन्हा एकदा सलमान खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. एका व्हिडीओमुळे तो ट्रोलर्सचं लक्ष्य बनला आहे. सलमान खानचा व्हायरल व्हिडिओ

सलमान खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल

सलमान खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान स्टेजवर नाचताना दिसत आहे आणि डान्स स्टेप दरम्यान त्याचा टी-शर्ट वर जातो तेव्हा त्याचे पोट दिसते. पण त्याची पोट सुटलेले, डान्स स्टेप्स करताना ते हालतानाही दिसत आहे. त्यामुळे सलमान खानला सर्वत्र ट्रोल केलं जात आहे ते त्याच्या लठ्ठपणामुळे. तसेच नेटवर एकच प्रश्न विचारलं जात आहे की, तो जे त्याच्या सोशल मीडियावर त्याचे फिटनेसचे, 6 सिक्सपॅकअ‍ॅब्सचे फोटो टाकतो किंवा चित्रपटात जे दाखवलं जातं ते सर्व फेक आहे का? त्यावरूनही सलमान खानला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

नेटिझन्स काय म्हणत आहे?

एका युजरने सलमान खानचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘सलमान खान सरही जाड झाले आहेत का?’ मग ते चित्रपटांमध्ये 6 पॅक कसे दाखवतात? यानंतर, या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला. एका वापरकर्त्याने हसणारा इमोजी शेअर करत लिहिले आहे की ‘टेक्नोलॉजी’. अजून एकाने लिहिलं की, “ते जाड झाले नाहीयेत, फक्त पोट थोडेसे बाहेर आले आहेत” अनेक वापरकर्त्यांनी असेही म्हटले की त्याचे 6 पॅक शरीर चित्रपटांमध्ये VFX द्वारे दाखवले जाते. तर एकाने लिहिले, ‘चित्रपटांमध्ये बनावट सिक्स पॅक दाखवले जातात ती कॅमेऱ्याची जादू आहे.’

चाहत्यांनी घेतली बाजू

तर ट्रोलर्सप्रमाणे सलमान खानच्या समर्थनार्थही त्याचे अनेक चाहते त्याची बाजू घेताना दिसले. अनेकांनी त्याच्या समर्थनार्थही कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले ‘तो 60 वर्षांचा आहे, त्याला ट्रोल करू नका मित्रांनो, स्वतःच्या फिटनेसकडे पहा”, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले ” तो 60 वर्षांचा आहे, त्याच्याकडून आणखी किती अपेक्षा करता येईल” .पण या व्हिडीओवर सलमानने अद्याप तरी प्रतिक्रिया दिलेली नाही.

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत