‘कधी संपणार यांचं हनीमून?’ सोनाक्षी सिन्हा अन् झहीरच्या रोमँटिक झोनला चाहतेही कंटाळले

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर हे लग्न झाल्यापासून कुठे ना कुठे फिरताना दिसत आहे.लग्नानंतर त्यांनी त्यांचा हनीमून साजरा करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली. आता मात्र नेटकरी त्यांच्या या रोमॅंटीक झोनला कंटाळलेले दिसत आहेत. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोंमुळे नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत.

कधी संपणार यांचं हनीमून? सोनाक्षी सिन्हा अन् झहीरच्या रोमँटिक झोनला चाहतेही कंटाळले
| Updated on: Jan 26, 2025 | 8:14 PM

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी वेगळ्या धर्मात लग्न करून आपला संसार थाटला. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा. सोनाक्षीने झहीर इक्बालसोबत लग्न केल्यानंतर ती प्रचंड चर्चेत आहे. बऱ्याच जणांनी त्यांना यावरून ट्रोलही केलं. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत या जोडीने एकमेकांच्या साथीने पुढे जाण्याचा विचार केला.

सोनाक्षी आणि झहीरची हनीमून टूर

दरम्यान सोनाक्षी आणि झहीर हे लग्न झाल्यापासून कुठे ना कुठे फिरताना दिसत आहे.लग्नानंतर त्यांनी त्यांचा हनीमून साजरा करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाच्या कमेंटस् केल्या. पण आता मात्र नेटकरी त्यांच्या या रोमॅंटीक झोनला कंटाळलेले दिसत आहेत.

‘यांचं हनीमून कधी संपणार?’, नेटकरी वैतागले

सोनाक्षीने नुकतेच झहीरसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्रामवर सिडनीमधील झहीरसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हासोबत तिचा पती झहीर इक्बाल देखील दिसत आहे. जो आपल्या पत्नीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे.
तर या फोटोमध्ये झहीर सोनाक्षीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे. मात्र त्यांच्या या फोटोंमुळे नेटकऱ्यांकडून ते ट्रोल होताना दिसत आहे. काहींनी तर ,” यांचं हनीमून कधी संपणार ?” अशा कमेंट्सही केल्या आहेत.

सोनाक्षीने शेअर केलेले फोटो जुने

पण सोनाक्षीने शेअर केलेले हे फोटो जुने आहेत. जे त्यांच्याकडून शेअर करायचे राहिले होते. सोनाक्षीने त्यांचे सिडनीमधील हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘सिडनीतील रविवार सेल्फी. काही पोस्टकार्ड फोटो, जे आम्ही पोस्ट करायला विसरलो होतो’ असं म्हणत कॅप्शन दिलं आहे.

यावरून हे लक्षात येत आहे की हे फोटो त्यांचे हनीमूनचेच आहेत पण ते जुने आहेत. मात्र तरीही चाहते तिला ट्रोल करत आहेत. यावरून सोनाक्षी आणि झहीरच्या रोमॅंटिक झोनला आता चाहते कंटाळल्याचे दिसून येत आहे.

सोनाक्षी सिन्हाने गेल्या वर्षी म्हणजेच 23 जून 2024 रोजी झहीर इक्बालसोबत नोंदणीकृत विवाह केला होता. सोनाक्षी आणि झहीर लग्नाआधी 7 वर्षे एकमेकांना डेट करत होते.