Bigg Boss | ‘बिग बॉस 14’च्या घरात मोठा ‘ट्विस्ट’, नव्या ‘तूफानी सिनिअर्स’ची एंट्री होणार?

दरवर्षी या घरात 16 ते 18 स्पर्धक दिसतात. मात्र, यावेळी केवळ 10 जणांनाच या घरात प्रवेश मिळाला आहे.

Bigg Boss | ‘बिग बॉस 14’च्या घरात मोठा ‘ट्विस्ट’, नव्या ‘तूफानी सिनिअर्स’ची एंट्री होणार?

मुंबई :बिग बॉस 14’च्या (Bigg Boss) घरात सध्या ‘तूफानी सिनिअर्स’चे (Toofani Seniors) राज्य सुरू आहे. सिद्धार्थ शुक्ला, हीना खान आणि गौहर खान हे तीनही तूफानी सिनिअर केवळ 14 दिवसांसाठी घरात असणार आहेत. त्यांना या 14 दिवसांत नव्या स्पर्धकांपैकी घरात राहण्यास पात्र असलेले स्पर्धक शोधायचे आहेत. आणखी काही दिवस या घरात तूफानी सिनिअर्सचा मुक्काम असणार आहे. मात्र, लवकरच घरात आणखी तीन नव्या ‘तूफानी सिनिअर्स’ची एंट्री होणार आहे. (New Toofani Seniors will enter in Bigg Boss house Soon)

सध्या घरात असलेले ‘तूफानी सिनिअर्स’ घराबाहेर गेल्यानंतर नव्या फ्रेशर्ससह तीन माजी स्पर्धकांची एंट्री होणार असल्याचे कळते आहे. माजी स्पर्धक असिम रियाझ, गौतम गुलाटी आणि रश्मी देसाई हे नवे ‘तूफानी सिनिअर्स’ म्हणून ‘बिग बॉस 14’मध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात ज्याप्रकारे सिद्धार्थ, गौहर आणि हीना एकत्र फ्रेशर्सबाबत निर्णय घेत आहेत, त्याचप्रमाणे काही नवीन स्पर्धकदेखील निर्णय घेतील. असिम, रश्मी आणि गौतम गुलाटी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत की नाही हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आले नसले तरी, सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा होत आहे. हे तिघेही गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ‘बिग बॉस 14’ च्या सेटवर दिसले होते. (New Toofani Seniors will enter in Bigg Boss house Soon)

‘वाईल्ड कार्ड’ स्पर्धकांची एंट्री

‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss) घरात लवकरच ‘वाईल्ड कार्ड’ स्पर्धकांची एंट्री होणार आहे. दरवर्षी या घरात 16 ते 18 स्पर्धक दिसतात. मात्र, यावेळी केवळ 10 जणांनाच या घरात प्रवेश मिळाला आहे. त्यामुळेच जुन्या स्पर्धकांना ‘तूफानी सिनिअर्स’ (Toofani Seniors) म्हणून खेळात सामील करण्यात आले आहे. म्हणूनच, लवकर आणखी 4 नवे चेहरे घरात दिसणार आहेत.

बिग बॉसचे नवे स्पर्धक ‘विकेंड का वार’च्या दिवशी सलमान खानची भेट घेऊन, सिक्रेट रूममध्ये कैद होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नैना सिंह, शार्दुल पंडित, रश्मी गुप्ता या तीन स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, चौथा स्पर्धक कदाचित पवित्रा पुनियाचा माजी प्रियकर प्रतिक सहजपाल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्वांना घरात येण्या आधी मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

(New Toofani Seniors will enter in Bigg Boss house Soon)

Published On - 10:40 am, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI