News9 Global Summit : रॉकस्टारनंतर वाटलं करिअर संपलं… नरगिस फाखरीने सांगितली संघर्षाची कहाणी
नरगिस फाखरी यांनी दुबईतील न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये बॉलिवूड प्रवास, भविष्यकाळातील योजना आणि जागतिक सिनेमातील संधींबद्दल भाष्य केले. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सची वाढती महत्त्व आणि आध्यात्मिक विचारांवरही प्रकाश टाकला.

टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’चे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले. या समिटला बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरीने हजेरी लावली. यावेळी ‘डायरी ऑफ अ रॉकस्टार’ या विशेष कार्यक्रमात नरगिस फाखरीने बॉलिवूडमधील तिचा प्रवास कसा होता, जर ती चित्रपटसृष्टीचा भाग नसती, तर तिने काय केले असते, यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नरगिस यांनी या मुलाखतीत त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.
यावेळी नरगिसला बॉलिवूडबाहेरील चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने मी कोणत्याही संधीला गमावणार नाही. मी अमेरिकन आहे. जर मला अरेबिक चित्रपटाची ऑफर आली तर मी ती नक्कीच करेन. अगदी चायनीज चित्रपट आला तरी मी करेन. कारण एक दिवस हे सगळं संपणार आहे. त्यामुळे मला शक्य तेवढं सगळं करायचं आहे.” असे नरगिस फाखरीने म्हटले.
मी नशीबवान होते म्हणून….
नरगिस फाखरीने यावेळी ‘रॉकस्टार’ चित्रपटाबद्दल भाष्य केले. २०११ मध्ये आलेल्या रॉकस्टार या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर नरगिस यांना वाटले नव्हते की मी इंडस्ट्रीत टिकू शकेन. परंतु मी ते करून दाखवले. “मी नशीबवान होते की मला या काळात ‘डिश्शूम’ आणि ‘मद्रास कॅफे’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मला संधी मिळत गेली आणि मी काम करत राहिले.” असे नरगिस फाखरीने म्हटले.
“मला काय करायचं हे समजत नव्हतं. इंडस्ट्रीत माझं कोणीच नव्हतं आणि मला मार्गदर्शन करण्यासाठीही कोणी नव्हतं. पण कोविडनंतर परिस्थितीत बदल झाला. ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी लोकांना नवीन संधी दिल्या आहेत. मी देखील ओटीटी एक्सप्लोर करत आहेत”, असे नरगिस फाखरी म्हणाली.
“मी पृथ्वीवर अनुभव घेण्यासाठी आले”
“मी आध्यात्मिक आहे. मला प्रत्येक धर्माबद्दल जाणून घ्यायला आवडतं. मला माझी स्वतःची वाढ अनुभवताना आनंद मिळतो. यामुळे मला अधिक ऊर्जा मिळते. मी धार्मिक नाही. पण मी आध्यात्मिक आहे. मी या पृथ्वीवर अनुभव घेण्यासाठी आले आहे”, असेही नरगिसने म्हटले.
दरम्यान नरगिस फाखरी अलीकडेच अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल 5’ या मल्टीस्टारर चित्रपटात झळकली. त्या ‘हाउसफुल 4’चा भाग नव्हत्या, परंतु २०१६ मध्ये आलेल्या ‘हाउसफुल 3’ मध्ये त्या झळकल्या होत्या. सध्या, नरगिस पवन कल्याणच्या ‘हरी हरा वीरा मल्लू’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहेत.