Bigg Boss 16: भांडणादरम्यान अभिनेत्रीला आला पॅनिक अटॅक; शालिनवर सलमान करणार कारवाई?

'बिग बॉस'च्या घरात हाय-व्होल्टेज ड्रामा; मानसिक स्थितीची खिल्ली उडवताच अभिनेत्रीला आला पॅनिक अटॅक

Bigg Boss 16: भांडणादरम्यान अभिनेत्रीला आला पॅनिक अटॅक; शालिनवर सलमान करणार कारवाई?
टेलिव्हिजन अभिनेत्री निम्रित कौर
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 01, 2022 | 11:51 AM

मुंबई: ‘बिग बॉस 16’च्या पुढील एपिसोडमध्ये खूप मोठा हंगामा होणार आहे. कारण कॅप्टन निम्रित कौर आहलुवालियाचा शालिन भनोटशी भांडण होणार आहे. हे भांडणं इतकं टोकाला पोहोचतं की निम्रित रडायलाच लागते. तिला श्वास घ्यायला त्रास होतो आणि अचानक पॅनिक अटॅक येतो. निम्रितची ही अवस्था पाहताच घरातील इतर सदस्य तिला शांत होण्याचं आवाहन करतात.

निम्रित-शालिनचं भांडण

बिग बॉसच्या पुढच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये निम्रित आणि शालिनचं जोरदार भांडण पहायला मिळतंय. बक्षिसाची कमी झालेली 25 लाख रुपयांची रक्कम परत मिळवण्यासाठी घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात आला आहे. यामध्ये गोल्डन बॉईज सोनं फेकतोय आणि सर्वांना ते सोनं आपल्याकडे जमा करायचं असतं.

सुंबुल तौकीर खान ही कॅप्टन्सीसाठी स्वत:ची दावेदारी सादर करते. हे ऐकून अर्चना गौतम आणि सुंबुल यांच्यात वाद सुरू होतो. कॅप्टन्सीसाठी निम्रित ही सुंबुलला साथ देते आणि त्यामुळेच शालिन-टीना नाराज होतात. यावेळी शालिनचा राग अनावर होतो आणि तो निम्रितशी जोरदार भांडू लागतो.

या भांडणादरम्यान शालिन निम्रितच्या मानसिक स्थितीची मस्करी करतो. हे ऐकून निम्रितचा पारा आणखी चढतो. भांडणादरम्यान तिला पॅनिक अटॅक येतो. निम्रितने याआधी बिग बॉसच्या घरात तिच्या मानसिक स्थितीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. नैराश्यात गेल्याचा खुलासा तिने केला होता. त्याचीच खिल्ली शालिनने उडवली.

‘छोटी सरदारनी’ फेम निम्रितची अशी अवस्था पाहून चाहतेसुद्धा दु:खी झाले. सोशल मीडियावर अनेकांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे शालिनला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय. एखाद्याच्या मानसिक स्थितीची अशा प्रकारे मस्करी करणं योग्य नाही, असं मत नेटकरी मांडत आहेत. आता यावर वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खान काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.