
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री निशा रावल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. निशा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ मधील सौम्या दीवानची भूमिका साकारून चर्चेत आलेल्या निशानं बर्याच टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

अभिनयापूर्वी निशा जाहिरातींमध्ये काम करत होती. निशानं अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलं आहे. तिनं रफू चक्कर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती हसते हसते चित्रपटात दिसली. आने वाला पाल या शोमधून निशाने टीव्हीमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर निशा केसर, मैं लक्ष्मी तेरे आंगन की यामध्ये दिसली होती. नच बलिए 5 आणि नच बलिये श्रीमन-श्रीमतीमध्ये तिचा नवरा करण मेहरासोबत डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसली. निशा सध्या 'शादी मुबारक' या मालिकेत काम करत आहे.

निशा रावलचा एक म्यूझिक व्हिडीओ फेमस झाला होता. ज्यामध्ये ती सोनू निगमसोबत दिसली होती. गाण्याचं नाव होतं- ‘चंदा की डोली में’. निशाचं हे गाणं हिट झालं होतं.

निशा रावलनं टीव्ही अभिनेता करण मेहराशी 5 वर्ष डेटिंगनंतर लग्न केलं. 2012 मध्ये दोघांचं लग्न झाले. दोघंही एका मुलाचे पालक आहेत. ‘हसते हसते’ या चित्रपटाच्या सेटवर निशा आणि करण यांची भेट झाली.

निशाने आपला मुलगा कविशबरोबर अनेक रील्स व्हिडीओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावर करण मेहराबरोबर निशाचे फोटो पाहून, दोघांच्या विवाहित जीवनात दीर्घ काळापासून तणाव होता, असा अंदाज बांधणं खूप अवघड आहे.

करणने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की तो आणि निशा घटस्फोट घेणार होते, मात्र निशानं अॅल्युमिनिमध्ये मोठी रक्कम मागीतली, जी करणला देणं शक्य नाही. अॅल्युमिनिच्या रकमेबद्दल संपूर्ण वाद आहे. करणच्या म्हणण्यानुसार, निशानं त्याला अडचणीत आणलं आहे आणि तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा खोटा आरोप केला आहे.