AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्यार हुआ इकरार हुआ… लेकाच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा परफॉर्मन्स; व्हिडीओ व्हायरल

Anant Ambani and Radhika Merchant pre wedding function : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन गुजरातमध्ये सुरू आहे. फक्त देशच नाही तर विदेशातूनही पाहुणे या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचले आहेत. जोरदार धमाका करताना बाॅलिवूड कलाकार या प्री वेडिंग फंक्शनमध्ये दिसत आहेत.

प्यार हुआ इकरार हुआ... लेकाच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा परफॉर्मन्स; व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Mar 02, 2024 | 7:32 PM
Share

मुंबई : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा आहेत. या प्री वेडिंग फंक्शनमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसले. मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे प्री वेडिंग फंक्शनच्या अगोदर गावातील लोकांना प्रेमाने जेवू घालताना दिसले आणि हेफंक्शन सुरू असून उद्यापर्यंत असेल. या प्री वेडिंग फंक्शनसाठी फक्त देशच नाही तर विदेशातूनही पाहुणे आणि कलाकार हे पोहचले आहेत. या प्री वेडिंग फंक्शनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ दिसतंय.

बाॅलिवूड कलाकारही या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचले आहेत. पाहुण्यांसाठी विशेष जेवणाची सोय ही अंबानी कुटुंबियांकडून करण्यात आलीये. तीन दिवसांमध्ये तब्बल 2500 पदार्थ हे पाहुण्यांना वाढले जात आहेत. नाश्त्यांमध्ये तब्बल 700 पदार्थ वाढतील. या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नीता अंबानी आणि नितेश अंबानी हे रोमांटिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. लेकाच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये आई वडीलही मागे नसल्याचे या व्हिडीओवरून दिसत आहे. राज कपूर यांचे फेमस गाणे ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यावर डान्स करताना मुकेश अंबानी आणि नीता अंबानी दिसत आहेत.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा हा क्यूट डान्स व्हिडीओ दिसतोय. लोकांना हा डान्स व्हिडीओ चांगलाच आवडताना दिसत आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या या डान्सच्या व्हिडीओवर लोक हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. या व्हिडीओबद्दल लोकांमध्ये एक मोठी क्रेझ नक्कीच आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, खूप क्यूट व्हिडीओ आहे.

दुसऱ्याने लिहिले की, अगोदरच्या काळात लोक प्रेम व्यक्त करत होते, त्यावेळी ते खूप जास्त क्यूट वाटायचे. या प्री वेडिंग फंक्शनमधील रिहाना हा सर्वात जास्त चर्चेतील विषय ठरलीये. रिहाना हिने एका शोसाठी 40 कोटी रूपये फिस घेतल्याचे सांगितले जातंय. रिहाना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. रिहाना जान्हवी कपूरसोबत डान्स करताना देखील दिसली.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.