AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 Marathi Exclusive | नितीन देसाई यांच्या ऑडिओ क्लिपमधील सर्वात महत्त्वाची माहिती

ज्येष्ट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या ऑडिओ क्लिपमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देसाई यांनी स्वत:ला संपवण्याआधी व्हॉईस रेकॉर्डरमध्ये आपला आवाज रेकॉर्ड करुन ठेवला होता. यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.

Tv9 Marathi Exclusive | नितीन देसाई यांच्या ऑडिओ क्लिपमधील सर्वात महत्त्वाची माहिती
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 03, 2023 | 11:09 PM
Share

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये स्वत:ला संपवलं. त्याच्या या टोकाच्या निर्णयामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झालीय. नितीन देसाई हे कर्जबाजारी होते. त्यांच्यावर 200 कोटींच्या पेक्षा जास्त रुपयांचं कर्ज होतं, अशी माहिती समोर येत आहे. देसाई यांनी मृत्यूआधी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये एडलवाईज कंपनीच्या व्यतिरिक्त इतर कोणावरही आरोप नाहीत. एडलवाईज कंपनीमुळे नितीन देसाई स्वतः कसे अडचणीत आले, त्यांची कशी फसवणूक झाली आणि मानसिक त्रास झाला? याचा लेखाजोखा त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये मांडलाय, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नितीन देसाई यांनी ऑडिओ क्लिपमध्ये राज्य शासनाच्या नावे एक भावनिक आवाहन केलंय. त्यात नितीन देसाई म्हणतात, “हा स्टुडिओ मोठ्या मेहनतीने आणि अनेक स्वप्न पाहून बनवलेला आहे. आयुष्यात अनेक संकटांना तोंड देऊन त्यांच्यावरती मात करत, मी हा स्टुडिओ उभा ठेवला. आयुष्यात अनेक चढउतार आले, यश-अपयश, ती सगळी मी पचवली. माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी संपत्ती आहे.”

नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत काही गंभीर आरोप केले आहेत. शिवाय राज्य सरकारने हा स्टुडिओ जतन करावा. माझ्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी नव्हे तर नव्या होतकरू कलाकारांसाठी त्याचा फायदा होईल, यासाठी सरकारने पाऊल उचलावे आणि स्टुडिओ स्वतःच्या ताब्यात घ्यावा, असं देसाई यांनी म्हटलंय.

होतकरू आणि मेहनती कलाकार या स्टुडिओच्या माध्यमातून घडतील. त्यामुळे संबंधित कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेच्या ताब्यात हा स्टुडिओ दिला जाऊ नये. त्याचं जतन करावं, असं देसाई यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय.

देसाई यांनी बनवलेल्या त्या धनुष्यबाणाच्या प्रतिकृतीचा अर्थ काय?

“अनेक संकटांना तोंड देत मी एनडी स्टुडिओचं हे शिवधनुष्य उचललं होतं. आजवर हे शिवधनुष्य मी पेललं. मात्र आता ते कठीण जातंय. मी या संकटातून बाहेर पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र पडू शकलो नाही. त्यामुळे आता थांबायची वेळ आलीय”, असं देसाई ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाले आहेत.

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या रेकॉर्ड करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वारंवार स्टुडिओचे शिवधनुष्य मी आत्तापर्यंत पेलेलं पण आता ते कठीण जातंय, असं बोलताना दिसत आहेत. आत्महत्या करताना जिथे गळफास घेतला त्याच्याखाली बनवण्यात आलेल्या धनुष्यबाणाचा हाच अर्थ आहे का? असा सुद्धा तर्क आता काढला जातोय. धनुष्यबाणाचं टोक असलेल्या ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन स्वत:ला संपवलंय.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?