
Nora Fatehi Crying Video: बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नोरा हिला मुंबत्र विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. पण नोरा यावेळी वेगळ्या परिस्थितीच दिसली. मुंबई विमानतळावर अभिनेत्री रडताना स्पॉट करण्यात आलं आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र नोराच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेही हिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर अद्याप नोराने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण नोराने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने ‘इन्ना लिल्लाही वा इन्ना इलैहि राजिउन.’ असं लिहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या बातमीवर इस्लाममध्ये हे वाक्य बोललं जातं. अभिनेत्रीची पोस्ट पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे.
विमानतळावर नोरा फतेही पूर्णपणे काळ्या रंगाच्या लूकमध्ये दिसली. अभिनेत्रीने काळा चष्मा घातला होता. ज्याने तिने आपले अश्रू लपवले. पण ती कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटू शकली नाही. विमानतळावर, जेव्हा एका चाहत्याने अभिनेत्रीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती वेगाने पुढे सरकली आणि तिच्या बॉडीगार्डने चाहत्याला मागे ढकलले. याचा एक व्हिडिओही सर्वत्र व्हायरल होत आहे.
नोरा फतेही हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने नुकताच ‘द रॉयल्स’ या वेब सिरीजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. यामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर, भूमी पेडणेकर, झीनत अमान, साक्षी तंवर, दिनो मोरिया आणि मिलिंद सोमण हे देखील होते.
नोरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.