AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Raj Thackeray joint victory rally: मदतीसाठी शिवतिर्थाचा दरवाजा दिसतो पण…, तेजस्विनी पंडितची मराठी कलाकारांवर टीका

विजयी मोळाव्यासाठी आलेल्या तेजस्विनी पंडितने मराठी कलाकारांवर केली टीका, अभिनेत्री म्हणाली, 'मदतीसाठी शिवतिर्थाचा दरवाजा दिसतो पण...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Uddhav Raj Thackeray joint victory rally: मदतीसाठी शिवतिर्थाचा दरवाजा दिसतो पण..., तेजस्विनी पंडितची मराठी कलाकारांवर टीका
फाईल फोटो
Updated on: Jul 05, 2025 | 11:40 AM
Share

Uddhav Raj Thackeray joint victory rally: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वरळी डोम याठिकाणी कार्यकर्ते जमले आहे. मराठी सेलिब्रिटी देखील ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार होण्यासाठी दाखल झाले आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील विजयी मेळाव्यासाठी उपस्थिती दर्शवली आहे…

तेजस्विनी पंडित म्हणाली, “अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप गोष्टी विभागल्या गेल्या आहेत. सर्वांत आधी महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे, महाराष्ट्रातला मराठी एकत्र यायला पाहिजे. आता लोकांनी हे जे वातावरण बिघडवलं आहे, यात बिघडण्यासारखं काहीच झालं नव्हतं. कारण आम्ही हिंदीविरोधात नाही. आम्ही सक्तीविरोधात होतो. मराठी बोलणार नाही, हा अट्टहास का? किमान शिकण्याचा तरी प्रयत्न करा,” अशी प्रतिक्रिया अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दिली.

समस्या असल्यास मराठी कलाकार राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी जातात. पण मराठी भाषेचा विषय असतो तेव्हा मोठ्या संख्येने कलाकार एकत्र का येत नाही. असा प्रश्न तेजस्विनी पंडित हिला प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला सुद्धा असा प्रश्न पडला आहे. असं का होत नाही. इतर वेळा मदत लागते तेव्हा शिवतिर्थाचे दरवाजे ठोठावले जातात आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा कलाकार का एकत्र येत नाही हा एक दुर्दैवी प्रश्न आहे.’

‘अवघा महाराष्ट्र आसुसलेला होता या दृष्यासाठी… ते दृष्य पाहण्यासाठी आज आम्ही येथे आलो होतो. मराठीचा विजय साजरा करण्यासाठी या दोन कारणांसाठी मी आज याठिकाणी आली आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

ते ज्या प्रकारे वागले..; बैठकीनंतर प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट
ते ज्या प्रकारे वागले..; बैठकीनंतर प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट.
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?.
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?.
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब.
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल.
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?.
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप.
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप.
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप.
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला..
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला...