Uddhav Raj Thackeray joint victory rally: भैय्या भेटला तरी चालेल मराठीतच बोला…, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
Uddhav Raj Thackeray joint victory rally: भैय्या भेटला तरी चालेल मराठीतच बोला..., 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेताच, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा लक्षवेधी व्हिडीओ होतोय सर्वत्र व्हायरल

Uddhav Raj Thackeray joint victory rally: मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज होणारा विजयी मेळावा राजकीय मेळावा नसल्यामुळे दोन्ही पक्षांचे झेंडे कुठेच लावण्यात आलेले नाही. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेताच, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा लक्षवेधी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मराठी भाषेवर बोलताना दिसत आहेत.
मराठी भाषेच्या अभिमानासाठी अन् मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी… pic.twitter.com/0b1hpT1rZy
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 5, 2025
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्हिडीओमध्ये प्रथम बोलताना दिसत आहेत. ‘मराठी ही आमची मातृभाषा आहे… भाषेला तुम्ही मानलंच पाहिजे बोललंच पाहिजे… भैय्या भेटला तरी चालेल मराठीत बोला…’ पुढे उद्धव ठाकरे म्हणताना दिसतात. ‘मराठ्यांच्या घोड्याच्या टापांचा जरी आवाज आला, तरी दुश्मनाची पळापळ व्हायची… त्या मराठीचं वाकडं करण्याची कोणाची टाप आहे? हमें मराठी नही आती… हे आपल्याला आपल्या घरात ऐकून घ्यावं लागतं… मी म्हणेल असा जिकडे आवाज येईल त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज आला पाहिजे…’
उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. ‘जिथे – जिथे मराठीवर अन्याय होतोय… मराठी भाषेचा अपमान होतोय… किंवा भूमिपुत्रांवर अन्याय होतोय तिथे आम्ही आंदोलन करायला कुठेही मागे हटणार नाही.’, व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये मराठी भाषेच्या अभिमानासाठी अन् मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी… असं लिहिलं आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विजयी मेळाव्याची चर्चा सुरु आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. वरळी डोम याठिकाणी मेळावा होणार आहे. पाऊस नसता तर मेळावा शिवतिर्थावर झाला असता… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.