AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Raj Thackeray joint victory rally: ठाकरे बंधूंचं ‘या’ 11 मुद्द्यांवर ठाम मत, मेळाव्यात नक्की काय होणार?

Uddhav Raj Thackeray joint victory rally: विजयी मेळाव्यात नक्की काय होणार, 20 वर्षानंतर मराठी माणससाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचं 'या' 11 मुद्द्यांवर ठाम मत... सध्या सर्वत्र मेळाव्याची चर्चा...

Uddhav Raj Thackeray joint victory rally: ठाकरे बंधूंचं 'या' 11 मुद्द्यांवर ठाम मत, मेळाव्यात नक्की काय होणार?
फाईल फोटो
Updated on: Jul 05, 2025 | 10:11 AM
Share

Uddhav Raj Thackeray joint victory rally: तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकत्र येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विजयी मेळाव्याची चर्चा सुरु आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. वरळी डोम याठिकाणी मेळावा होणार आहे. पाऊस नसता तर मेळावा शिवतिर्थावर झाला असता… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तर मेळाव्या आधी ठाकरे बंधूचं 15 मुद्द्यांवर ठाम मत झालं आहे. ते 15 मुद्दे कोणते ते जाणून घेऊ…

विजयी मेळाव्यातील 11 महत्त्वाचे मुद्दे

1. सकाळी 11.30 वाजता ठाकरे बंधू वरळी डोमला पोहोचणार आहेत. वरळी डोममध्ये मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

2. मेळाव्यात केवळ ठाकरे बंधू यांची भाषणं होणार आहे. इतर पक्षांचे वरिष्ठ नेते आल्यास त्यांची देखील भाषणं होतील.

3. व्यासपीठासमोर महाराष्ट्राटा झेंडा लावण्यात आला आहे. बाकी सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार आहेत.

4. मोजकीच भाषणे होतील असं देखील सांगण्यात येत आहेत. इतर नेत्यांची भाषणं होतील की नाही… शक्यता कमी आहे.

5. संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमिक ठाकरे देखील व्यासपीठाच्या खालीस बसणार आहेत.

6. मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

7. सर्वांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची प्रतीक्षा आहे. आधी उद्धव ठाकरे, त्यानंतर राज ठाकरे यांचं भाषण होणार असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.

8. किती कार्यकर्त्ये उपस्थित राहतील हा आकडा सांगणं कठीण आहे. ज्यामुळे वरळी डोमच्या बाहेर देखील एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

9. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकारणासाठी नाही तर मराठी भाषेसाठी एकत्र आले आहेत. या क्षणाची अनेकांना प्रतीक्षा होती.

10. दोन्ही पक्षांच्या खांद्यावर समान जबाबदार देण्यात आली आह.

11. बॅनरबाजी, पोस्ट, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचले जाणारा नाही याती कळजी घेण्याच्या सूचना देखील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

इतक्या वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्याहाचं वातावरण आहे. आता सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त दोघांच्या भाषणाकडे आहे…

छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.
मराठीचा अपमान अन् खळ्ळखट्याक! रिक्षा चालकाला चोपला
मराठीचा अपमान अन् खळ्ळखट्याक! रिक्षा चालकाला चोपला.
ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!
ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी.