AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nushrratt Bharuccha : मला नेहमीच…अपघातानंतर नुसरत भरुचाची पहिली पोस्ट, शेअर केली हेल्थ अपडेट

Nushrratt Bharuccha : बाली येथील अपघातानंतर नुसरत भरुचानं पहिल्यांदा पोस्ट शेअर केली असून हेल्थ अपडेट शेअर केली आहे.

Nushrratt Bharuccha : मला नेहमीच...अपघातानंतर नुसरत भरुचाची पहिली पोस्ट, शेअर केली हेल्थ अपडेट
| Updated on: Oct 10, 2026 | 9:41 PM
Share

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा नुकताच बालीमध्ये अपघात झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं असून, तिला बसणं आणि उभं राहणं कठीण झालं आहे. अभिनेत्रीनं आता तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून एक अपडेट दिली आहे. नुसरत भरुचानं शनिवारी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एक विशेष मेडिकल चेअर दिसत आहे, जी आधार देण्यासाठी आणि बसण्याच्या आरामदायक स्थितीसाठी वापरली जाऊ शकते.

नुसरत भरुचाची पोस्ट

अपघातानंतर नुसरतनं पहिली पोस्ट शेअर केली आहे. नुसरतने फोटोसोबत एक कॅप्शनही लिहिलं आहे. अभिनेत्रीनं लिहिलं की, ‘मला नेहमीच सूर्यास्त पाहण्याचं वेड होतं, पण आता माझा दृष्टिकोन बदलला आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.’ यावरून अभिनेत्री लवकरच कमबॅक करणार असल्याचं समजून येत आहे.

नुसरतचा अपघात कसा झाला

नुसरत भरुचाचा बालीमध्ये अपघात झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं आहे. नुसरत सध्या मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहे.

अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा नुकताच बालीमध्ये अपघात झाला. अभिनेत्री कामाच्या निमित्तानं आणि सहलीसाठी बालीला गेली होती. मात्र, नुसरतचा बालीमध्ये अपघात झाला. अपघातानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाल्याचं समजलं. यानंतर, पुढील शस्त्रक्रियेसाठी तिला मुंबईला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. नुसरत २ ऑक्टोबर रोजी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत दाखल झाली.

अभिनेत्री या चित्रपटात दिसणार

रिपोर्ट्सनुसार, नुसरत अभिनेता टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. पहिल्यांदाच नुसरत आणि टायगर एकत्र सिनेमात झळकणार आहेत. सध्या, चित्रपटातील नुसरतच्या भूमिकेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. वृत्तानुसार, तिची भूमिका केवळ एका नायिकेपुरती मर्यादित न राहता, कथेमध्ये एक महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. नुसरत भरुचानं 2006 मध्ये आलेल्या ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर ती ‘कल किसने देखा’, ‘ताजमहाल’ आणि ‘लव्ह सेक्स और धोखा’ यांसारख्या सिनेमांमध्ये दिसली.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे