Actress Life: म्हाताऱ्या दिग्दर्शकाची अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, शारीरिक संबंध ठेव तरच…, आईकडे तक्रार केली अन्…

Actress Life: इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना अनेक वाईट अनुभव येत असतात. असंच काही एक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. तिच्याकडे एका म्हाताऱ्या दिग्दर्शकाने विचित्र मागणी केली... तिला म्हणालेला, शारीरिक संबंध ठेव तरच..., आईकडे तक्रार केली अन्...

Actress Life: म्हाताऱ्या दिग्दर्शकाची अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, शारीरिक संबंध ठेव तरच..., आईकडे तक्रार केली अन्...
Niti Taylor
| Updated on: Oct 09, 2026 | 3:00 PM

 

Actress Life: टीव्ही इंडस्ट्री आणि सिनेविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत त्यांना अनेक वाईट प्रसंगांचा समाना करावा लागला आहे. याच कारणामुळे अनेक अभिनेत्री मागे राहिल्या, तर काहींनी सिनेविश्वाचाच निरोप घेतला. पण काही अभिनेत्री अशा देखील आहेत, त्यांनी सर्व संकटांवर मात केलं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक बड्या सेलिब्रिटींनी अभिनेत्रींकडे नको ती मागणी केली. एका अभिनेत्रीकडे म्हाताऱ्या दिग्दर्शकाने शारीरिक संबंधांची मागणी केली… याबद्दल अभिनेत्रीने तिच्या आईकडे देखील तक्रार केली. पण आत तिच टीव्ही विश्वावर राज्य करत आहे.

Loading...

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री निती टेलर आहे. निती हिने अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. एक मुलाखतीत निती हिने सांगितलं होतं की, एका दिग्दर्शकाने तिच्याकडे विचित्र मागणी केली होती. त्यानंतर अभिनेत्रीने त्या प्रोजेक्टमध्ये काम करणंच सोडून दिलं.

निती म्हणालेली, ‘मी पूर्वी दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करत होती. मी 2 सिनेमांमध्ये काम केलं. त्या दिग्दर्शकासोबत माझा पहिलाच सिनेमा होता. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर त्याने मला फोन आणि दुसऱ्या सिनेमाची ऑफर दिली. त्या दिग्दर्शकाने मला सांगितलं, ‘पण यावेळी सिनेमात काम करण्यापूर्वी तुला माझ्यासोबत झोपावं लागेल… हे ऐकून मी पूर्णपणे थक्क झाली…’

‘मला कळतंच नव्हती मी कसं रिएक्ट करायला हवं होतं. मी लगेचच त्याचा फोन कट केला आणि तिचा नंबर ब्लॉक केला आणि आईला फोन करुन सर्व काही सांगितलं. तो दिग्दर्शक म्हातारा होता. मी त्याला दुसऱ्या मुलींसोबत देखील पाहिलं होतं. मला कळून चुकलं होतं की, ही गोष्ट माझ्यापर्यंत देखील येणार आहे…’

नीती हिने सांगितल्यानुसार, त्या घटनेनंतर ती पूर्णपणे घाबरलेली. तिने संबंधित दिग्दर्शकाच्या सिनेमात काम करण्यास नकार दिला. निती हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारली. ती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी निती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us