AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Politics: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड! माजी मंत्री शिंदेंच्या गोटात? ठाकरेंना धक्का बसणार?

जळगावात माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातींमध्ये आनंद दिघे , एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.  सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आल्या होत्या.

Jalgaon Politics: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड! माजी मंत्री शिंदेंच्या गोटात? ठाकरेंना धक्का बसणार?
| Updated on: Nov 22, 2026 | 2:12 PM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी: जळगावच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगावमध्ये माजी मंत्री सुरैश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर शिवसेना शिंदे गटाचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आनंद दिघे यांचा फोटो झळकला आहे. ठाकरे गटातून राजीनामा दिल्यानंतर कुठल्याच पक्षात जाणार नाही, असं सुरैश जैन यांनी स्पष्ट केले होते, मात्र आता त्यांच्या जाहिरातींमध्ये शिंदेंचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

माजी मंत्री सुरेश जैन यांच्या जाहिरातीत एकनाथ शिंदे, आनंद दिघेंचे फोटो! 

समोर आलेल्या माहितीनुसार,  जळगावात माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातींमध्ये आनंद दिघे , एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.  सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आल्या होत्या. या  जाहिरातींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे मंत्र्याचे आमदारांचे फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना ठाकरे गटात असताना सुरेश जैन यांनी मे 2024 मध्ये पक्ष सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.  ठाकरे गटात सदस्य पदाचा राजीनामा दिल्यावर आपण कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे सुरेश जैन यांनी स्पष्ट केलं होते. शिवसेना ठाकरे गटात असताना सुरेश जैन यांनी राजीनामा देऊन वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते.

ठाकरे गटाचा दिला होता राजीनामा, जैन नेमके कोणाचे? 

अशातच आता शिवसेना शिंदे गटात नसताना देखील सुरेश जैन यांच्या जाहिरातीत शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो दिसल्याने चर्चेचा विषय झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे  जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे मात्र उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटाच्या नेत्यांचा कुठलाही फोटो नसल्याने नेमकं पडद्यामागे काय घडतंय? असा सवाल निर्माण होत आहे.

दरम्यान, जळगाव लोकसभा निवडणुकीत सुरेश जैन यांनी भाजपच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला होता. अशातच आता जाहिरातींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो तर लोकसभेत भाजपला पाठिंबा यामुळे सुरेश जैन नेमके कुणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच  शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो झळकल्याने ही आगामी काळात काही राजकीय समीकरणाची नांदी आहे का? असा देखील प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

Follow Us
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित