
बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल या दोघी सध्या त्यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमुळे चर्चेत आहेत. शोच्या दर एपिसोडमध्ये येणाऱ्या नव्या पाहुण्यांसोबत मजेशीर गप्पा, काही खोचक प्रश्नोत्तरं यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. या शोच्या लेटेस्ट भागात कोरिओग्राफर- दिग्दर्शिका फराह खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे आल्या होत्या. काजोल आणि ट्विंक शोमध्ये अनेकदा विनोदी पद्धतीने सामाजिक विषयांवर चर्चा करतात. या या भागात तेच झाले. नव्या भागात शोमध्ये नातेसंबंध आणि अफेअर्सवर चर्चा झाली, पण त्यावेळी केलेल्याविधानांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली.
प्राइम व्हिडिओच्या हॉट टॉक शो ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ च्या लेटेस्ट भागात, ट्विंकल खन्नाने अफेअर्सवर बोलत असा बॉम्ब टाकला की स्टुडिओमध्ये अनेकांना हसू फुटलं पण नव्या वादालाही फोडणी मिळाली. पाहुण्या म्हणून आलेल्या फराह खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत ‘ॲग्री- डिसॲग्री’ या सेगमेंटमध्ये असे काही प्रश्न विचारण्यात आले होते, ज्यावर ट्विंकल खन्नाचे मत जाणून मैत्रिण काजोलला चांगलाच धक्का बसला.
लफडं लपवण्यात म्हातारे वस्ताद
‘ॲग्री- डिसॲग्री’ सेगमेंटमध्ये काजलो- ट्विंकलने पाहुण्यांना एक रोमांचक प्रश्न विचारला – ‘वयस्कर लोक त्यांचे अफेअर लपवण्यात तरुणांपेक्षा चांगले असतात का?’ असा प्रश्न आल्यावर, ट्विंकल खन्नाने लगेच सहमती दर्शवली. ती म्हणाली, ” मोठे लोकं यात (लपवालपवीत) अगदीच कुशल असतात, त्यांचा खूप सराव असतो.” असं विधान तिने केलं, तिच्या या बोलणायवर फराह खान आणि अनन्या पांडे यांनी सहमती दर्शवली.
काजोल झाली हैराण
मात्र ट्विंकलचं हे बोलणं ऐकून काजोल मात्र चांगलीच हैराण झाली, तिच्या या विधानाशी काजोल सहमत नव्हती. तिने थेट तिचं म्हणणं मांडलं. “मला वाटतं तरुण लोक त्यांच्या आयुष्याबद्दल, अगदी अफेअर्सबद्दलही सगळं लपवण्यात जास्त पटाईत असतात.” यावर अनन्या पांडे म्हणाली की, सोशल मीडियामुळे आता सगळं बाहेर येतं. या विषयावर आपले मत व्यक्त करताना फराह खानने टोला हाणला. ‘तरुण लोक प्रेमात नसतात, तेव्हाही सगळं काही पोस्ट करतात.’ असं ती म्हणाली.
कपड्यांपेक्षा वेगाने बदलतात पार्टनर
त्यानतंर आणखी एका विधानावरून वाद झाला. “आजकाल मुलं कपडे बदलण्यापेक्षा जास्त वेगाने जोडीदार बदलतात.” यावर ट्विंकलने पुन्हा एकदा सहमती दरर्शवली, तर इतर तिघी जणी असहमत होत्या. पण ही चांगली गोष्ट असल्याचं ट्विंकल म्हणाली. “आमच्या काळात असं होतं की, ‘लोक काय म्हणतील? आपण हे करू शकत नाही, असाच विचार लोकं करायचं. पण आता ते (तरुण लोक) अधिक वेळा जोडीदार बदलत आहेत आणि मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे.” असं ट्विंकलने नमूद केलं.
अनन्या पांडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितलं की हे फक्त आजच्या पिढीला लागू होत नाही, लोक नेहमीच पार्टनर्स बदलत आले आहेत, पण पूर्वी या गोष्टी फक्त शांतपणे घडत असत असं तिने सांगितलं.
प्रतारणेवरून याआधीही झाला वाद
या शोमध्ये अशा वादग्रस्त विषयावर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील भागात, ट्विंकल आणि काजोल यांनी शारीरिक प्रतारणा, ही लग्नात अडथळा आणणारी गोष्ट नाही असे विधान खळबळ उडवून दिली होती. शारीरिक प्रतारणेपेक्षा मानसिक चाटिंग ही जास्त मोठी असते, असं त्या म्हणाल्या होत्या. ट्विंकल अक्षय कुमारच्या लग्नाला 24 वर्ष तर अजय काजोलच्या लग्नाला 27 वर्ष होत आली आहेत.