AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omkar Karve : मराठी इंडस्ट्रीत एक रावण, याचंही दहन..; व्यक्तीचं थेट नाव घेत अभिनेत्याचे गंभीर आरोप, पोस्ट व्हायरल होताच..

Omkar Karve : मराठी अभिनेता ओमकार कर्वेनं एका निर्मात्याचं थेट नाव घेत त्याच्यावर आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

Omkar Karve : मराठी इंडस्ट्रीत एक रावण, याचंही दहन..; व्यक्तीचं थेट नाव घेत अभिनेत्याचे गंभीर आरोप, पोस्ट व्हायरल होताच..
| Updated on: Oct 21, 2026 | 3:42 PM
Share

मराठी अभिनेता ओमकार कर्वेनं एका मुलाखतीत एका निर्मात्यावर नाव न घेता आरोप केले होते. एका निर्मात्यामुळं मला मालिकेतून काढलं गेलं, कामं मिळेनाशी झाली, जगायचं कसं आणि खायचं काय? हा भयंकर अनुभव अभिनेत्यानं सांगितलेला. अशातच काल ओमकार कर्वेनं त्या निर्मात्याचं नाव घेत, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलेली. मात्र, अभिनेत्याची ही पोस्ट फेसबुकनं डिलीट केली. त्यासंबंधही ओमकारनं पोस्ट शेअर केली आहे.

ओमकार कर्वेची पोस्ट

ओमकारनं फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिलेलं की, ‘आज रावणाच दहन केलं जातं. मराठी कलाक्षेत्रात एक रावण आहे निर्माता, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, स्पॉटबॉय , कलाकार, EP, शेड्युलर, संगीत दिग्दर्शक, माणूस घाणी, माणसांना शिव्या देणारा, माणसांना मारणारा, स्वतःच्याच प्रोडक्शनमध्ये गुप्त हेर असतात तसे बातम्या पोचवणारे अपॉईंट करणारा, माणसांना जनावरा प्रमाणे वागवणारा, ‘संतोष अयाचित’ याचंही दहन व्हायला पाहिजे आणि मी सुरुवात केली आहे.’

‘मागच्या 2 पॉडकास्टपासून. मी याला वाचा फोडली, म्हणून चॅनेलला खोट सांगून मालिकेतून काढून टाकलं. कारण, समोरासमोर हा माझ वाकडं करू शकणार नव्हता. पण स्वतःच्या डोळ्यांनी प्रोडक्शनमधले नवीन कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर शिवीगाळ ऐकून, मारताना पाहून, जेवणापासून चे सगळेच हाल पाहून आश्चर्य चकित झालो होतो. त्याची ही वृत्ती मनात फारकाळ दबून राहणार नव्हती, हे ठाऊक होतं आणि आता वेळ आली आहे. या अयाचितला उघडं पाडायची. जे माझ्या मताशी सहमत आहात त्यांनी पुढे या. मी मागे हटणार नाही. अत्याचाराला वाचा ही फोडलीच पाहिजे. हा रावण सोकवला आहे. मुळापासून उपटून टाकायची वेळ आली आहे.’

ओमकारनं फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. याबद्दल पोस्ट करत अभिनेत्यानं लिहिलं की, ‘खूप जणांचे मेसेज आले की, पोस्ट का डिलीट केली कालची? तर ती पोस्ट डिलीट केली नाही तर ती रिपोर्ट केली गेली. म्हणून fbने काढली. परत करेन पोस्ट.’

Follow Us
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....